एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डची हत्या केली. ही हत्या महिलेच्या पतीने केली. हत्या करण्याआधी पतीने 'कामाची एक लिस्ट' बनवली होती. पतीची इच्छा होती की, हत्येनंतर त्याला पत्नीसोबत मनभरून रोमान्स करायचा होता. पण पतीच या हल्ल्यात जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2016 मधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सुप्रीम कोर्ट ऑफ विक्टोरियामध्ये यावर सुनावणी होत आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने पतीला सांगितलं की, मुलाखातर त्याने एक्स बॉयफ्रेन्डची हत्या करावी.
आरोप आहे की, ग्लेन कॅसिडीने मायकल कॅपोसिएनाला कथितपणे आपली पत्नी बियांका एडमंडसच्या सांगण्यावरून मारलं. एडमंडसने आपला पती कॅसिडीला सांगितलं की, तू मायकल कॅपोसिएनाला मेलबर्नच्या वेस्टमीडाउसमध्ये संपव. नंतर दोघात झालेल्या वादात महिलेचा पती कॅसिडी याचाच मृत्यू झाला. त्याच्यावर दोन ते तीन वेळा चाकूने हल्ला केला होता.
सुप्रीम कोर्ट ऑफ विक्टोरियामध्ये याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ज्यूरींना यासंबंधी ती लिस्टही दिसली. ज्यातून समोर आलं की, कॅसिडीच्या कामांच्या लिस्टमध्ये लग्न, सेक्स आणि पत्नीची प्रेग्नेसी या गोष्टींचा समावेश होता. ही सगळी कामं त्याला हत्येनंतर करायची होती.
रिपोर्टनुसार, तेव्हा कॅसिडीने केवळ एका गोळीने मायकल कॅपोसिएनाला मारलं होतं. त्यानंतर त्याने त्याची रायफल त्याची गर्लफ्रेन्ड सिल्वाना सिल्वाला दाखवली होती. ज्याबाबत त्याने नंतर सांगितलं होतं.
याप्रकरणी कोर्टात ते फु़टेजही दाखवण्यात आलं, ज्यात कॅसिडीने कॅपोसिएनाच्या घराचा दरवाजा वाजवला होता आणि मग गोळी झाडून हत्या केली होती. एडमंडसने त्याच्यावर लागलेले आरोप नाकारले आहेत. सध्या कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.