कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इस्रायली स्टुडंट्स असलेली एक मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये फिरण्यासाठी आली होती. मध्यरात्री ती फिरत असतानाच तिच्याबरोबर अशी घडना घडली, ज्यात तिचा मृत्यू ओढवला. विशेष म्हणजे घटना घडत असताना ती मुलगी बहिणीशी फोनवर बोलत होती. व्हिक्टोरिया पोलिसांनी ही माहिती दिली आहे. तसेच पोलिसांनी जनतेकडे 21 वर्षीय ऐय्या मासरवेच्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. जिचा मृतदेह बुधवारी सकाळी मेलबर्न विश्वविद्यापीठाच्या परिसरात सापडला.पोलिसांनी सांगितलं की, ती मुलगी स्वतःच्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. ती परदेशातून फोनवर बोलत असतानाच आजूबाजूला काही तरी चुकीचं घडत असल्याचं पाहिल्यानंतर ती जोरात ओरडली आणि तिची ती किंकाळी तिच्या बहिणीनं फोनवर ऐकली. तिची बहीण स्टॅम्पर म्हणाली, माझी बहीण फोनवर बोलत असतानाच जमिनीवर कोसळण्यासह इतरही आवाज ऐकू आले. ज्या ठिकाणावरून ती बोलत होती, त्या ठिकाणापासून जवळपास 50 मीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला आहे. त्याच स्टॉपवरून ती ट्रामच्या बाहेर निघाली होती.पोलिसांनी स्टॅम्परनं दिलेल्या माहितीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. यासाठी पोलिसांनी काही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थिनीचे पालकही आता ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहेत.
बहिणीशी फोनवर बोलत असतानाच 'ती' ओरडली अन् होत्याचं नव्हतं झालं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 4:48 PM