नदीत मगरीशी आणि समुद्रात शार्क माशाशी कधीच वैर घ्यायचं नाही, असे म्हणतात. शार्क समुद्रात आढळणारा सर्वात मोठा हिंस्र मासा आहे. समुद्रात माशाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतात, यातील बहुतेक घटनेत शार्क मासा हल्लेखोर असतो. ऐरवी शांत राहणारा शार्क मासा रक्ताचा वास आल्यावर आक्रमक होतो. अशाच एका शार्क माशाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये घडली आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनी बे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्रात पोहत असताना एका विशाल शार्कने एका व्यक्तीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या व्यक्तीला काहीच करता आले नाही. यावेळी शार्कने त्या व्यक्तीला आपल्या जबड्यात पकडले आणि आपल्या टोकदार दातांनी त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शार्क सूमारे 15-17 फूट लांब होती. आपल्या धारदार जबड्याने शरीराचे दोन तुकडे केल्यानंतर तिने त्या व्यक्तीचे पूर्ण शरीर खाल्ले. समुद्रात असलेल्या एका मच्छिमाराने आपल्या डोळ्यांने हे भयानक दृष्य पाहिले. पण, शार्कसमोर तोही त्या व्यक्तीला वाचवू शकला नाही. 1963 नंतर प्रथमच घडली अशी भीषण घटना आहे.