जगभरातील लोक रोमांचक असं काही करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. लोक कधी जंगलात फिरायला जातात तर कधी वेगळा काही विचित्र अनुभव घेताता. त्यानंतर लोक त्यांचा या गोष्टींचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करतात. काही लोकांना थरारक काहीतरी करायचं असतं. त्यासाठी ते अशा ठिकाणी फिरायला जातात जिथे धोका असतो. पण अनेकदा असं करणं त्यांना चांगलंच महागातही पडतं. ऑस्ट्रेलियातील एका तरूणीने असाच तिचा एका अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
ऑस्ट्रेलियातील एका टीव्ही चॅनलवर ऑस्ट्रियातील स्टेफनी ब्रोविटने तिचा वेदनादायी अनुभव शेअर केला. 2019 मध्ये ती तिची बहीण आणि वडिलांसोबत न्यूझीलॅंडमधील व्हाइट आयलॅंड व्होल्कॅनो बघायला गेली होती. पण ज्वालामुखीमध्ये झालेल्या उद्रेकाच्या कचाट्यात तिचा पूर्ण परिवार आला. यावेळी आयलॅंडवर 47 लोक उपस्थित होते. ज्यातील 22 लोकांचा मृत्यू झाला होता. इतर लोक गंभीरपणे जखमी झाले होते. स्टेफनीला या दुर्घटनेत बहीण आणि वडिलांना गमवावं लागलं होतं. सोबतच स्टेफनीचं शरीरही जवळपास वितळलं होतं. मात्र, तिचा जीव वाचला.
टीव्ही शोमध्ये आलेल्या स्टेफनीने लोकांसोबत तिच्यासोबत घडलेली घटना शेअर केली. मरण पावलेल्या लोकांमध्ये तिची 21 वर्षीय बहीण क्रिस्टल आणि वडील पॉल हेही होते. तेच स्टेफनी स्वत: दोन आठवडे कोमात होती. तिचं शरीर 70 टक्के भाजलं होतं. ती तिच्या परिवारासोबत बोटीने आयलॅंडवर गेली होती. या अपघातात सुदैवाने तिची आई वाचली होती. तिने आयलॅंडवर जाण्यास नकार दिला होता. ती बोटीत बसून त्यांची वाट बघत होती. यादरम्यान अचानक स्फोट झाला आणि सगळेच त्यात सापडले. दोन वर्षानंतरही स्टेफनी त्या दुर्घटनेतून बाहेर निघू शकलेली नाही.
मेलबर्नमध्ये राहणारी स्टेफनीने लोकांसोबत तिचा फ्यूचर प्लान शेअर केला. तिने सांगितलं की, ते सगळं विसरणं तिच्यासाठी फार अवघड आहे. बराच काळ स्टेफनीला तिच्या या जखमा कपड्यांनी झाकून ठेवाव्या लागल्या होत्या. पण आता तिच्या जखमा जवळपास भरल्या आहेत. आता तिला तिचं बालपणीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तिने मीडिया आणि आर्ट्समधून डिग्री घेतली आहे. तिचं हेच पॅशन आहे. आता ठीक झाल्यानंतर स्टेफनीला यातच तिचं करिअर करायचं आहे. त्यासोबतच तिला इतर लोकांचं आयुष्यही बदलायचं आहे. यासाठी ती मोटिवेशनल स्पीकरही बनणार आहे.