whale fish dying : सर्वात मोठ्या माशांपैकी एक असलेल्या व्हेल माशांवर मोठे संकट ओढवले आहे. पृथ्वीवरील एक जागा व्हेलसाठी स्मशान बनली आहे. व्हेल मासे इथे येऊन रहस्यमयपणे मरत आहेत. शेकडो व्हेल मरण पावल्यामुळे तज्ज्ञही विचारात पडले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्य किनारपट्टीवर आतापर्यंत सुमारे 100 व्हेलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हेल मासे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर पोहोचतात आणि नंतर मरण पावतात. अलीकडेच 45 व्हेल येथे पोहोचल्या, लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यात यश आले नाही. जीव गमावलेल्या माशांना पायलट व्हेल म्हणून ओळखले जाते. हे मासे ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आल्यानंतर मृत्यूला बळी पडत आहेत.
व्हेलला वाचवण्यासाठी पथक तैनातसुमारे 100 वन्यजीव अधिकारी आणि 250 स्वयंसेवक व्हेलला वाचवण्यासाठी चेन्स किनाऱ्यावर उपस्थित आहेत. माशांच्या मृत्यूची पहिली माहिती 25 जुलै रोजी समजली, जेव्हा येथे डझनभर व्हेल मृतावस्थेत आढळून आले. यानंतर, उर्वरित व्हेलला वाचवण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या, परंतु आणखी डझनभर व्हेलला आपला जीव गमवावा लागला.
मृत्यूचे कारण काय?किनाऱ्यावर व्हेल माशांचा मुक्काम एक रहस्य आहे. वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ताणतणाव आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आजार हे असे करण्यामागे कारण असू शकतात, मात्र यावर ठोस काहीही सांगता येत नाही. माशांच्या सांगाड्याचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा निकाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे स्पष्ट होईल.