मेलबर्न : खरेतर देशात कोठेच बुरखा वापरला जाऊ नये असे मला वाटते; पण ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलांना बुरखा वापरण्यास बंदी घालण्यास आपला पाठिंबा आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी म्हटले आहे.
संसद सभागृह ही सुरक्षित इमारत असते, येथे येणा:या लोकांचे चेहरे दिसले पाहिजेत. येथे पोशाखाचा वेगळा नियम घालता येणार नाही. सर्वाकरिता येथे सारखा नियम असेल.
समाजाचा एक गट जर चेहरा उघडा ठेवून वावरत असेल तर सर्व गटांनी तोच नियम पाळला पाहिजे, असे अॅबॉट म्हणाले. ही इमारत सुरक्षित आहे, येथे ज्या लोकांना आत येण्याचा पास मिळतो त्यांची ओळख पटली पाहिजे असे अॅबॉट म्हणाले.
(वृत्तसंस्था)