वॉशिंग्टन : अमेरिकेची ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्था २०२० मधील मंगळ मोहिमेत अतिप्रगत रोव्हरसोबत (एक प्रकारची गाडी) छोटे हेलिकॉप्टरही मंगळावर पाठविणार आहे. पृथ्वीवरील हवाई वाहनाच्या परग्रहावर वापराची ही पहिलीच वेळ असेल.‘नासा’ने म्हटले की, २०२०च्या मोहिमेत रोव्हरसोबत हेलिकॉप्टर पाठविले जाईल. हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवल्यानंतर रोव्हरला सुरक्षित अंतरावर थांबण्याचे निर्देश मिळतील. बॅटऱ्या चार्ज झाल्यावर व चाचण्या घेतल्यानंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून स्वचलित हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या कमांड मिळतील.योजनेनुसार ३० दिवसांच्त हेलिकॉप्टरची पाच उड्डाणे केली जातील. सुरुवातीस ते सरळ वर जाऊन १० फुटांवर एकाच जागी ३० सेकंद गरगरत राहील. हळूहळू वेळ व अंतर वाढवत ते काही शे मीटर आणि ९० सेकंद केले जाईल. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार मंगळावरील वापरासाठी हेलिकॉप्टर किती उपयुक्त, व्यवहार्य ठरते याच्या चाचपणीसाठी ते पाठवले जात आहे. भविष्यात मंगळाच्या वातावारणाचा अभ्यास करण्यासाठी व जमिनीवरून जेथे पोहोचता येत नाही तेथे पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल.या योजनेच्या व्यवस्थापक मिमी आँग हा म्हणाल्या की, पृथ्वीवर हेलिकॉप्टर ४० हजार फुटांपर्यंत उड्डा़ण करू शकते. मंगळाच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाच्या एक टक्का आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर जमिनीवर न स्थिरावता एक लाख फूट उंचीवरच तरंगत असेल. त्याचे उड्डाण तेथून पुढील उंचीवर होईल.जुलै २०२० मध्ये रोव्हर व हेलिकॉप्टर घेऊन अग्निबाण मंगळाच्या दिशेने झेपावेल. ते फेब्रुवारी २०२१ मध्ये तेथे पोहोचेल. हे रोव्हर मंगळाच्या मातीच्या अभ्यास करेल व तेथील वातावरण मानवी वस्तीसाठी कितपत पोषक आहे याचा अंदाज घेईल.कसे असेल हेलिकॉप्टरस्वचलित, रिमोट कंट्रोलने चालणारेवजन १.८ किलोग्रॅम.परस्परविरुद्ध फिरणाºया पात्यांच्या २ जोड्यात्यांचा वेग मिनिटाला तीन हजार फेºयासौरऊर्जेवरसाठी लिथियम-आयॉन बॅटºयाप्रचंड थंडी असताना उबदार ठेवण्याची व्यवस्था
मंगळावर पाठविणार स्वचलित हेलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:56 AM