सुख म्हणजे नेमकं काय असतं? व्यक्तीगणिक याच्या व्याख्या बदलत जातील. कारण आजकाल जो तो सुखाच्या शोधात धडपड करताना दिसत आहे. अर्थात, त्यानंतरही सुखाचा शोध लागतोच असे नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर देणेही तसे अवघडच आहे. हा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारणही तसे खासच आहे. अमेरिकेच्या अलास्कामधील एक कुटुंबीय घरदार, शहर सोडून दूर एकांतात राहायला गेले आहे. त्याची सद्या बरीच चर्चा आहे. डेव्हिड अॅशले, त्यांची पत्नी रोमी आणि मुलगा स्काई हे तिघेही अलास्कापासून ४०० किमी दूर एकांतवासात रहायला गेले आहेत. शहरातील गर्दी, दररोजची धावपळ, घड्याळाच्या काट्यावरील कसरत, भौतिक वस्तूंचा हव्यास, घर, कार, बंगला, बँक बॅलेन्स आदी सर्व मोहपाशातून स्वत:ची सुटका करून घेत हे कुटुबं दूर गेले आहे. दूर राहिल्यामुळे मनाला शांती मिळत असल्याचे ते सांगतात. ते सद्या ज्या भागात राहतात तिथे जंगली प्राणीच त्यांचे शेजारी बनले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत असल्याचे ते सांगतात. त्यामुळेच सुटीशिवाय वर्षातून दोन तीन वेळेस ते या व्यापातून दूर जातात.
तेरी दुनिया से दूर!
By admin | Published: July 11, 2017 1:51 AM