चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. मात्र, नुकतेच नासाच्या हाती मोठे यश लागले आहे. चंद्रावर पाणी शोधण्यास नासाच्या संशोधकांना यश आले असून नुकतीच नासाने याची घोषणा केली आहे. चंद्राच्या सूर्य प्रकाश असलेल्या भागाकडे हे पाणी सापडले आहे.
नासाने चंद्राच्या नेहमीच सावलीत असलेल्या पृष्ठभागावर शोध घेतला. तेथे 40000 चौ किमीच्या क्षेत्रफळात पाणी असल्याचे आढळले आहे. हे पाणी थंड हवामानामुळे गोठलेले आहे. या जलकणांचा वापर करून चंद्रावरील पुढील मोहिमा राबविता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रावर राहण्यास जाण्याचे अनेक वर्षांपासून मानवाचे स्वप्न आहे. तसेच नासाच्या चंद्रावरील पुढील मोहिमांनाही पाठबळ मिळाले आहे. 2024 मध्ये नाला चंद्राच्या दक्षिणेकडील भागात दोन अंतराळवीर पाठविणार आहे.
अनेक दशकांपासून चंद्र हा कोरडा असल्याचे मानले जात होते. मागील संशोधनांमध्ये चंद्रावर पाण्यासारखा पदार्थ सापडला होता. मात्र, हे पाणी एच 2 ओ आणि हायड्रॉक्सिलमध्ये फरक सिद्ध करू शकले नव्हते. तेव्हापासून नासाला आशेचा किरण दिसू लागला होता. नवीन संशोधनात चंद्रावर पाण्याचे कण असल्याचे आढळले आहे आणि रसायनशास्त्राद्वारे ते सिद्धही झाले आहे.
नासाचे सुवर्ण महोत्सवी वर्षचंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. त्याआधी म्हणजेच 18 जुलै 1969 ला नासाच्या यानाने चंद्राकडे झेप घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाला नासाने रोमांचकारी असे 400 फोटो प्रसिद्ध केले आहेत. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्राँग ने. पण या नील आर्मस्ट्राँगसोबत आणखी दोघेजण या मोहिमेवर होते. आर्मस्ट्राँग यांनी पहिले पाऊल ठेवले पण दुसरे पाऊल कोणी ठेवले याबाबत माहिती नसेल. या व्यक्तीचे नाव होते. एल्ड्रिन. चंद्रावर पाऊल ठेवतानाचा फोटो आर्मस्ट्राँगॉचा नाही तर एल्ड्रिन यांचा आहे. कारण तेव्हा आर्मस्ट्रॉन्गच कॅमेरा हाताळत होते.
पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता?पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेव्हाच्या उच्च दर्जाचा हेजेलब्लाद कॅमेरामधून हे फोटो काढण्यात आले आहेत. हे कॅमेरे स्वीडनमध्ये बनविले जातात. एल्ड्रिन यांच्या पावलाचे ठसे आजही चंद्रावर आहेत. कारण तेथे वायूमंडळ नाही तसेच पाऊसही पडत नाही.अशा प्रकारचे अन्य फोटो मार्च 1969 मध्ये घेण्यात आलेले अपोलो-9 चे फोटो आहेत. यामध्ये अंतराळात यान पृथ्वीभोवती फिरत आहे आणि अंतराळवीर डेव स्कॉट खिडकीतून बाहेर पडून पृथ्वीकडे पाहत आहेत.