शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 22:05 IST

थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे.

Ayodhya In Thailand : येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू झाली आहे. भारतात असा कोणी नाही, ज्याला श्रीराम आणि अयोध्या शहराचे महत्व माहित नाही. अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला आणि याच ठिकाणी त्यांनी रामराज्य चालवले. पण, तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील अयोध्येप्रमाणेच थायलंडमध्येही एक अयोध्या आहे, जी अयुथया नावाने ओळखली जाते.

थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे. थायलंडमधील या शहराचे नाव अयोध्येच्या नावावरून अयुथ्या ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, थायलंडच्या राजांच्या नावांसोबत रामाचे नाव जोडले जाते. ही तेथील प्राचीन परंपरा आहे. तेथील राजवंशातील प्रत्येक राजा हा श्रीरामाचा अवतार मानला जातो. अयोध्या आणि भगवान रामाचाचा थायलंडच्या अयुथ्याशी काय संबंध आहे? जाणून घ्या...

अयुथ्याचा इतिहास काय आहे?असे म्हटले जाते की अयुथ्या ही प्राचीन थाई राज्य "आयुथयाना" ची राजधानी होती. युत्यायन वंशातील राजे हे रामाचे अवतार मानले जात होते आणि त्यांच्या नावाला रामाचे नाव जोडले जायचे. 1350 ते 1767 पर्यंत या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या राजांना रामतीबोधी ही पदवी देण्यात आली होती.

हीच त्यांची प्रभू रामावरची नितांत भक्ती होती. रामायणाचे भारतात जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व इथे आहे. या ठिकाणी आजही अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना समर्पित पूजास्थळे थायलंडची राजधानी बँकॉकपासून फक्त 50 किलोमीटर दूर आहेत. आयुथयाने आजही आपला गौरवशाली इतिहास जपला आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरThailandथायलंडramayanरामायणInternationalआंतरराष्ट्रीय