जगभरात ज्यांच्या भविष्यवाणींची चर्चा असते असे दोन प्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रादमस आणि बाबा वेंगा यांनी २०२२ बाबतही खूप काही सांगून ठेवले आहे. यापैकी बाबा वेंगा यांच्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. वेंगा यांनी यापूर्वीही अनेक भविष्ये सांगितली होती, त्यापैकी अनेक खरी ठरली तर अनेक गोष्टी खोट्या ठरल्या आहेत.
बाबा वेंगा यांनी आपल्या अनुयायांकडे जवळपास 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केलेल्या आहेत. द मिररनुसार बाबा वेंगा यांनी २०२२ मध्ये काही देशांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल असे म्हटले होते. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांमध्ये १९५० पासूनचा सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे.
याचबरोबर एकीकडे दुष्काळ असताना आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याचे बाबा वेंगा हिने म्हटले होते. तसेच भूकंप, त्सुनामी येईल असे म्हटले होते. अतिवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर विध्वंस झाला होता. तसेच भारत, थायलंडसह काही देशांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बाबा वेंगा ही एक फकीर होती. तिचा १९११ मध्ये बल्गेरियात जन्म झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षीच तिची दृष्टी गेली होती. तिने वर्तविलेले ८५ टक्के अंदाज खरे ठरले आहेत. 2022 बाबत बाबा वेंगा यांनी आणखी चार भविष्यवाणी केल्या आहेत. यामध्ये सायबेरियामध्ये आणखी एक जिवघेणा व्हायरस जन्माला येणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर २०२२ मध्ये पृथ्वीवर एलिअन्स हल्ला करतील, असेही म्हटले आहे. लोकस्ट नावाचा कीडा देखील अनेक देशांत हल्ले करेल, असेही तिने म्हटले आहे. याचबरोबर व्हर्चुअल रिअॅलिटीचा वापर वाढणार असल्याचे तीने म्हटले होते. बाबा वेंगा हिचा कर्करोगामुळे १९९६मध्ये मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी 5079 वर्षापर्यंतचे भाकीत केले आहेत. बाबा वेंगाच्या मते, जगाचा अंत ५०७९ मध्ये होईल. या भविष्यवाण्या कुठेही तिने लिहिलेल्या नव्हत्या, तर त्या तिच्या अनुयायांना सांगितलेल्या होत्या.