सॅन बर्नांर्दो (अर्जेटिना) : अतिउत्साही पर्यटकांनी छोट्या डॉल्फिनसोबत आपल्याला सेल्फीज काढता याव्यात यासाठी पाण्याबाहेर काढलेला या बाळ डॉल्फीनचा दुर्देवी मृत्यू झाला. २२ जानेवारी रोजी येथे स्वत: पर्यटकांनीचया छोट्या डॉल्फीनला पाण्याबाहेर ओढून काढल्याचे वृत्त ‘ला कॅपिटल’ या दैनिकाने दिले. पर्यटकांनी त्याच्यासोबत सेल्फीज काढण्याचा व त्याला हात लावून बघण्याचा प्रयत्न केला व माणसांच्या एवढ्या गर्दीत वेढला गेल्यामुळे हा छोटा डॉल्फीन मरण पावला. या सगळ््या घटनेचे भयकारी फुटेज सीएन फाईव्ह या वृत्त केंद्राने टिष्ट्वटरवर पोस्ट केले. या दुर्देवी घटनेला साक्ष असलेल्या क्लॉदिआ नावाच्या पर्यटक महिलेने सांगितले की पर्यटकांमुळेच त्याचा मृत्यू झाला. तो डॉल्फीन अगदी तरूण होता आणि तो किनाऱ्यावर आला होता. पर्यटक त्याला परत पाण्यात पाठवू शकले असते. खरे तर तो श्वास घेत होता. परंतु प्रत्येक जण त्याला स्पर्श करीत होता व त्याच्यासोबत सेल्फी काढत होता. गेल्या वर्षीही फेब्रुवारी महिन्यात अर्जेटिनामध्ये पर्यटकांच्या सेल्फीच्या वेडापायी अत्यंत दुर्मिळ ला प्लॅटा डॉल्फीन मरण पावला होता.
अतिउत्साही पर्यटकांनी घेतला बेबी डॉल्फिनचा जीव
By admin | Published: January 30, 2017 12:36 AM