अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाशिवाय फ्लोरिडामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली असून या घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. फ्लोरिडामध्ये (Shooting in Florida) हल्लेखोरांनी मार्टिन ल्यूथर किंग डे साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला, तर कॅलिफोर्नियामध्ये (Shooting in California) टुलारे काउंटीच्या गोशेनमध्ये झालेल्या गोळीबारात 6 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील मध्य कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका महिलेसह सहा महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. गोशेनमधील हार्वेस्ट रोडच्या 6800 ब्लॉकमधील स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे 3:30 वाजता गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून डेप्युटर्सना घरी बोलावण्यात आले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा तपास सुरू आहे.
रिपोर्ट असे म्हटले आहे की, घटनास्थळी पोहोचल्यावर डेप्युटर्सना दोन लोक रस्त्यावर आणि तिसरा व्यक्ती घराच्या दारात मृतावस्थेत आढळले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत किमान दोन संशयित सामील असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
याचबरोबर, अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये हल्लेखोरांनी मार्टिन ल्यूथर किंग डे साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले आणि या कार्यक्रमात सहभागी असलेल्या आठ जणांना गोळ्या घातल्या. या घटनेनंतर लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये गोळीबारानंतर लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत.