ऑनलाइन लोकमतप्योंगयांग, दि. 23 - उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं आहे. उत्तर कोरियानं गेल्या आठवड्यात मिसाइल परीक्षण केलं असून, एका आठवड्यात उत्तर कोरियानं दोनदा मिसाइल परीक्षण केलं होतं. सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं चाचणीदरम्यान 500 किलोमीटरचे अंतर पार करत 560 किलोमीटर उंचावरून मारा केला. त्यानंतर मिसाइल प्रशांत महासागरात प्रवेशकर्ती झाली. या मिसाइलचं परीक्षण किम जोंग ऊन यांच्या देखरेखीखाली झालं. किम जोंग उन हे या मिसाइल परीक्षणामुळे संतुष्ट असून, या प्रकारच्या मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, असं वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलं आहे. KCNAच्या मते, या मिसाइलची लक्ष्य भेदण्याची क्षमता अचूक असून, सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं आमचं सर्वात यशस्वी सामरिक शस्त्र असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच या मिसाइल कोरियन कोरियन द्विपकल्पात तैनात करण्याचेही किम जोंग उन यांनी आदेश दिले आहेत. अमेरिकेनं वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियानं स्वतःचं मिसाइल परीक्षण थांबवलेलं नाही. अमेरिकेनं उत्तर कोरियाच्या मिसाइल परीक्षणावरून त्यांना इशारा देत सांगितलं होतं की, उत्तर कोरियानं मिसाइल परीक्षण न थांबवल्यास त्यांचाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या वादामुळे कोरियन द्विपकल्पाचं पूर्ण क्षेत्र प्रभावित झालं आहे.
जपान, अमेरिकेवर हल्ल्यासाठी उत्तर कोरिया बनवणार बॅलिस्टिक मिसाइल
By admin | Published: May 23, 2017 2:08 PM