इस्लामाबाद:पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला रॉकेट आणि इतर घातक शस्त्रांनी करण्यात आला आहे. ही घटना आवारन जिल्ह्यातील पिरंजर भागात घडली. हे ठिकाण बलुचिस्तान प्रांतात आहे. या घटनेत मोठ्या संख्येने पाक सैनिक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. पण, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात कमीत-कमी 11 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट
केला केला हल्ला?
मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानच्या नागरिकांवर अत्याचर केला जातो. अनेकदा बलुचिस्तानच्या नागरिकांकडून पाक सैन्यावर अत्याचाराचा आरोप करण्यात येतो. तसेच, बलुचिस्तानच्या सैन्याकडून अनेकदा पाक सैन्यावर असे हल्ले केले जातात. तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या लष्करावर बलुचिस्तानमध्येच मोठा हल्ला झाला होता. त्यात पाच पाकिस्तानी जवान ठार आणि सुमारे 27 जखमी झाले होते.