ऑनलाइन लोकमत
चीन, दि.31 - हत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंत्तच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली. सन २०१७ अखेरपर्यंत हस्तीदंत्ताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे. नामशेष होणाºया प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये आॅक्टोबर २०१६ आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला. जगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा ७० टक्के सहभाग आहे हे विशेष. यापूर्वी केनिया देशाने एप्रिल २०१६ मध्ये १०५ टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.