शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अफगाणिस्तानात गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी; आणखी एक जुलूम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:10 AM

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते.

काबूल : अफगाणिस्तानमधीलतालिबान राजवटीने गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही साधने म्हणजे जगातील मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी आखलेला कट असल्याची टीका तालिबानने केली आहे. गर्भनिरोधक साधने वापरू नयेत यासाठी तालिबानी दहशतवादी घराघरात जाऊन महिलांना धमकावत असल्याचे वृत्त ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र अशी कोणतीही बंदी घातली नसल्याची सारवासारव तालिबान सरकारने केली आहे. 

ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, गर्भनिरोधक साधने विकायची नाहीत अशा धमक्या तालिबानचे दहशतवादी औषधाच्या दुकानदारांना देत आहेत. अफगाणिस्तानातील काबूल, मजार-ए-शरीफ या दोन शहरांमध्ये या साधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गर्भनिरोधक साधनांच्या विक्रीला मज्जाव करून तालिबान सरकारने महिलांवर पुन्हा अन्याय केला आहे. 

महिलांच्या शिक्षणावर वरवंटाअफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी त्या देशात महिलांना मोकळा श्वास घेऊ शकत होत्या. काबूल विद्यापीठामध्ये महिलांचा सहभाग असलेले अनेक उपक्रम पार पडत होते. त्या देशातील अनेक महिला भारतासहित अनेक देशांत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या अफगाणिस्तानात परतल्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रात नोकऱ्या करत होत्या. मात्र तालिबानी राजवट आल्यानंतर महिलांचे बहुतांश हक्क हिरावून घेण्यात आले.

कोलमडली आरोग्यव्यवस्थाअफगाणिस्तानात आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. तेथील १४ पैकी एका महिलेचा प्रसूतीत निर्माण झालेल्या समस्यांमुळे मृत्यू होतो. जगात अफगाणिस्तानसह असे काही देश आहेत की जिथे प्रसूतीसाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. गर्भनिरोधकसाधनांवर बंदी घालण्याबाबत तालिबान सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र त्यांनी या साधनांवर अघोषित बंदी लागू केली आहे. 

महिलांवर अनेक बंधनेअफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर तेथील महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. त्यांना महाविद्यालये, विद्यापीठात शिक्षण घेण्यास मनाई करण्यात आली. महिलांनी नोकरी करू नये, एकटीने घराबाहेर जाऊ नये अशी बंधने त्यांच्यावर लादण्यात आली आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान