शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 2:50 PM

बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार पडण्यामागे जमात-ए-इस्लामीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतपर्धान शेख हसीना यांनी काल(दि.6) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. त्यामुळेच आता बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, यात सैन्य, पत्रकार, उद्योगपती, अर्थशास्त्री, राजकारणी अशा व्यक्तींचा समावेश असेल. दरम्यान, या सत्तांतरानंतर जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी संघटना इस्लामिक स्टुडंट कॅम्पबाबत चर्चा सुरू झाली आहे. शेख हसीना यांचे सरकार उखडून टाकण्यात इस्लामिक स्टुडंट कॅम्पची सर्वात मोठी भूमिका आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांत बांग्लादेशातील विविध विद्यापीठांमध्ये इस्लामिक स्टुडंट कॅम्पच्या अनेक कॅडरची भरती करण्यात आली. येथूनच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम सुरू झाले. आरक्षणाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे विद्यार्थी इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनचे होते.

इस्लामिक स्टुडंट कॅम्पचा दबदबाबहुतांश विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये इस्लामिक स्टुडंट कॅम्पचे वर्चस्व आहे. पण ढाका विद्यापीठ, चितगाव विद्यापीठ, जहांगीर विद्यापीठ, सिल्हेत विद्यापीठ आणि राजशाही विद्यापीठ हे त्याचे गड मानले जातात.

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत जेएमबी समर्थकांचा विजयबांग्लादेशातील बहुतेक मोठ्या विद्यापीठांमध्ये गेल्या 3 वर्षात निवडणुका जिंकलेल्या सर्व विद्यार्थी संघटनांचा या विद्यार्थी संघटनेला पाठिंबा आहे. विद्यार्थी राजकारणाव्यतिरिक्त ही संघटना मदरशांच्या कार्यातही सक्रिय सहभाग घेते. भारतात अटक करण्यात आलेले जेएमबीचे बहुतांश सदस्य जमात-ए-इस्लामी बांग्लादेशचे आहेत.

संघटनेचे हे प्रमुख नेते आहेतनूरुल इस्लाम, बुलबुल मोहम्मद, नजरुल इस्लाम आणि कमाल अहमद सिकदर हे या संघटनेचे प्रमुख नेते आहेत. या संघटनेचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी अत्यंत सखोल संबंध आहेत आणि तिचे अनेक कार्यकर्ते पाकिस्तान आणि बांग्लादेशातही गेले आहेत.

इंडिया आऊट मोहीम राबविण्यात आलीमालदीवच्या धर्तीवर बांग्लादेशातही इंडिया आऊट मोहीम सुरू करण्यात आली. यामागे इस्लामिक स्टुडंट कॅम्पचा हात होता. या मोहिमेमागील संपूर्ण कट पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयचा होता. यावेळी आयएसआयचे लोक विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलनात सामील झाले होते. 

आयएसआयएसने सत्ताबदलाची ब्लू प्रिंट तयार केलीगुप्तचर अहवालानुसार, लंडनमध्ये आयएसआयएसच्या मदतीनेच बांग्लादेशातील सत्तांतराची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. बांग्लादेशी अधिकाऱ्यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे तारिक रहमान आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये झालेल्या बैठकीचे पुरावे आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळण्यापूर्वी सरकारविरोधात 500 हून अधिक निगेटिव्ह ट्विट करण्यात आले होते. 

आंदोलक हसीना यांच्या राजीनाम्यावर ठाम होतेबांग्लादेशातील विद्यार्थी आरक्षणाविरोधात आंदोलन करत होते. हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या, मात्र त्यानंतरही त्यांनी आंदोलन संपवले नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी सुरू केली. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. सध्या त्या हिंडन एअरबेसवरील सेफ हाऊसमध्ये आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशagitationआंदोलनInternationalआंतरराष्ट्रीय