शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:33 PM

भारताचा शेजारील बांग्लादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे.

Bangladesh Violence : गेल्या अनेक महिन्यांपासून बांग्लादेशात सरकारविरोधी आंदोलन सुरू होते. हळुहळू या आंदोलनाचे रुपांतर हिंसाचारात झाले, ज्यामुळे शेक हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. देशातील नागरिकांमध्ये हसीना यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड राग भरला आहे. याचे पडसाद अमेरिकेतही उमटले आहेत. आंदोलकांनी न्यूयॉर्कमधील बांग्लादेश वाणिज्य दूतावासात घुसून माजी राष्ट्रपती आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये आंदोलक वाणिज्य दूतावासात घुसून बांग्लादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आंदोलकांनी बांगलादेशच्या ध्वजाच्या रंगांच्या टोप्या घातल्याचे दिसत आहे. या आंदोलकांसमोर दूतावासातील अधिकारी हतबल दिसतात. अधिकारी हात जोडून शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हिंसाचारग्रस्त देशापासून दूर असलेल्या अमेरिकेत ही घटना का घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, बांग्लादेशातील आंदोलकांच्या मनात शेख हसीना यांच्या कुटुंबाविषयी इतका राग भरला आहे की, त्यांनी सोमवारी शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा पाडला. याशिवाय काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत संसद भवनावरही घुसून मालमत्तेची लूट आणि तोडफोड केली. शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानात आंदोलक घुसल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आलेमिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशात हिंदूंच्या घरांवर, व्यवसायांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. 27 जिल्ह्यांमध्ये या घटना घडत आहेत. मेहेरपूरमध्ये एका मंदिरावर जमावाने हल्ला केला. याशिवाय इस्कॉन मंदिरावरही जमावाने हल्ला केल्याचे वृत्त आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केलीमंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांग्लादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. 

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतAmericaअमेरिकाagitationआंदोलन