शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
5
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
6
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
7
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
8
बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
11
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
12
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
13
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
14
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
15
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
16
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
17
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
18
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
19
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
20
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू

बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 9:17 AM

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.

भारताचे शेजारी एकामागोमाग एक बेजार होत चालले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये अराजकतेची स्थिती आहे. अशातच बांगलादेशात पंतप्रधानांना देश सोडून पळावे लागले आहे. बांगलादेशात हिंसाचार असल्याने हजारो बांगलादेशी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकजण घुसलेले आहेत. तर त्या बांगलादेशात म्यानमारचेरोहिंग्या घुसत आहेत. 

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्य महिला, लहान मुले आणि अनेक कुटुंबेच्या कुटुंबे असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे. या ठिकाणी मृतदेहांचे ढिगारे असल्याचे व आपल्या नातेवाईकाला लोक शोधत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी हा ड्रोन हल्ला झाला आहे. बांगलादेशच्या सीमेवर घुसण्याच्या प्रयत्नात असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिखलाच्या जमिनीवर मृतदेहांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी २०० चा आकडा सांगितला आहे. 

रोहिंग्यांचा इतिहास...मुळचे बांगलादेशीचरोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमारचा बहुसंख्य बौद्ध समुदाय यांच्यातील वाद १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. अराकान या राज्यात १६ व्या शतकापासून मुस्लिम राहतात. या भागावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बांगलादेशातून अराकानमध्ये मजूर आणण्यास सुरुवात केली. यामुळे अराकानमधील मुस्लिम वस्ती वाढू लागली. या लोकांना रोहिंग्या म्हणून ओळखले जाऊ लागले. रोहिंग्यांची वाढती संख्या पाहून म्यानमारच्या जनरलने 1982 मध्ये बर्माचा राष्ट्रीय कायदा लागू केला. यानुसार त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून रोहिंग्या मुस्लिम ना बांगलादेशचे ना म्यानमारचे राहिले, ते अनेक देशांत स्थलांतरीत होत आहेत.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारRohingyaरोहिंग्या