शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चीनमध्ये धावणार विजेवर चालणाऱ्या गाड्या, पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 8:15 PM

वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी ऑटो मार्केट असेलेल्या चीनमध्ये वाहन तयार करणाऱ्या कंपनीला याविषयी डेडलाइनही दिली आहे.

ठळक मुद्देविजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला सरकारकडून आर्थिक मदतइंधन-ज्वलनामुळे नायट्रोजन व सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड, हायड्रोकार्बन हे रासायनिक प्रदूषक वाढत असल्याचे निदर्शनातचीनपूर्वी ब्रिटन आणि फ्रांसमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

बीजिंग, दि. 11 - वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी ऑटो मार्केट असेलेल्या चीनमध्ये याविषयी वाहन तयार करणाऱ्या कंपनीला डेडलाइन दिली आहे. यामध्ये त्यांनी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. विजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्यास सुरुवात करा असाही आदेश देण्यात आला आहे. चीनपूर्वी ब्रिटन आणि फ्रांसमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार वायु प्रदूषण रोखण्यासाठी ब्रिटेनमध्ये 2040 नंतर फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या विकल्या जातील.

इंधन-ज्वलनामुळे नायट्रोजन व सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड, हायड्रोकार्बन हे रासायनिक प्रदूषक वाढत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर चिनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्री अँड इन्फर्मेशन टेक्नॉलजीचे मंत्री शिन गुओबीन यांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेल वाहानांचे उत्पादन आणि विक्री रोखण्यासाठी सरकार काम करत आहे. यावर लवकरच उपाययोजना काढू. या निर्णयामुळे पर्यावरण आणि चीनच्या ऑटो मार्केटवर मोठा परिणाम होणार आहे.

विजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. कडक नियम केल्यास पेट्रोल-डिझेल गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा बसेल. 2030 पर्यंत चीन सरकार सर्वच पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांलर बंदी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शिन यांनी सांगितले.कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल, गडकरींचा कार उत्पादकांना इशारापर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वेहिकल्सवर लवकरच सरकार धोरण आखणार असून सध्या या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सूचित केले. भविष्य पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचे नसून पर्यायी ऊर्जेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी आधी तुम्हाला नम्रपणे संशोधन करण्यास सांगितले. प्रथम ज्यावेळी मी बोललो, त्यावेळी तुम्ही म्हणालात बॅटरी खूप महाग पडते. आता बॅटरीची किंमत 40 टक्क्यांनी घसरली आहे. आणि तुम्ही आता उत्पादनाच्या दृष्टीने सुरूवाती कराल तर या किमती आणखी कमी होतील, असे ते म्हणाले. कार, बसेस, टॅक्सी अथवा मोटरसायकल काही असो भविष्य हे वीजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :chinaचीन