शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बराक ओबामा इसिसचे संस्थापक, ट्रम्प यांची खरमरीत टीका

By admin | Published: August 11, 2016 5:58 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे इसिस दहशतवादी संघटनेचे संस्थापक असल्याची घणाघाती टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 11 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे इसिस दहशतवादी संघटनेचे संस्थापक असल्याची घणाघाती टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी हिलरी क्‍लिंटन यांच्यावर इसिसच्या संस्थापक असल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी नव्याने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाच लक्ष्य केलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ट्रम्प यांनी इसिस या दहशतवादी संघटनेचे संस्थापक बनवून टाकल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री फ्लोरिडा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ओबामा यांना 'बराक हुसेन ओबामा' असे संबोधून त्यांचं मुस्लिमांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी भाषण देताना "ते इसिसचे संस्थापक आहेत' असा तीनदा उल्लेख केला.

प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करून ट्रम्प नेहमीच चर्चेत राहत असतात. याआधी "क्‍लिंटन यांना अध्यक्षपदापासून शस्त्रधारी व्यक्तीच दूर ठेवू शकतो,' असे वक्तव्य त्यांनी केले . त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर ओबामा हे मुस्लिम असून, त्यांचा जन्म केनियात झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र ओबामा हे ख्रिश्चन असून, हवाई येथे त्यांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे.