वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ:यात त्यांचे नवरात्रचे उपवास होत व या काळात त्यांनी फक्त गरम पाणी प्याले होते. तरीही त्यांचा उत्साह व ऊर्जा वाखाणण्यासारखी होती. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा चांगलेच प्रभावित झाले असून, त्यांनी योगासनांत रस दाखविला आहे.
ओबामा यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फस्र्ट लेडी मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये योगा सुरूकेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या उत्साहामुळे व त्यांच्या ऊज्रेमुळे ओबामा यांना आश्चर्य वाटत आहे.
ओबामा योगाची चौकशी करत असून, त्यासंदर्भात त्यांनी सहायक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल यांच्याशी संवाद साधला. हे बोलणो अगदी वैयक्तिक व खाजगी होते, असे बिस्वाल म्हणाल्या. 2क्क्9 पासून व्हाईट हाऊसच्या इस्टर एग रोल कार्यक्रमात योगासने केली जातात. दरवर्षी 3क् हजार कुटुंबे यात सहभागी होतात. 135 वर्षापासून व्हाईट हाऊसमध्ये साजरा होणा:या या कार्यक्रमाला ओबामा दाम्पत्याने कौटुंबिक रूप दिले व त्यात योगासने हा मुख्य कार्यक्रम ठेवला.
64 वर्षाचे मोदी योगासने करतात. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणात, आंतरराष्ट्रीय योगा दिन जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस सदस्य तुलसी गबार्ड यांनी यासंदर्भात अमेरिकन काँग्रेसकडून ठराव मंजूर करून घेऊ असे म्हटले आहे.
(वृत्तसंस्था)