शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

वटवाघळाचा ब्रिटनहून रशियापर्यंत रेकॉर्डब्रेक प्रवास; पोहोचताच मांजरीच्या तावडीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 2:59 PM

Nathusius’ pipistrelle नावाचे हे वटवाघुळ मानवाच्या अंगठ्याच्या आकाराचे होते. हे वटवाघुळ रशियाच्या एका गावात सापडले.

मॉस्को: प्राणी, पक्ष्यांची स्थलांतर करण्याची बाब त्यांच्या जिवनातील एक सामान्य प्रक्रिया असते. मात्र, एका वटवाघळाने (BAT) सर्व रेकॉर्डच तोडले आहेत. त्याने ब्रिटेन ते रशिया असा हजारो किमींचा प्रवास केला. आजवरचा हा वटवाघळाने केलेला सर्वात लांबचा प्रवास होता. दुर्दैव म्हणजे हा या वटवाघळाचा शेवटचा प्रवास ठरला. रशियात पोहोचताच तेथील एका मांजराने या वटवाघळाची शिकार केली. (A bat has made it to the headlines who travelled from London to Russia, but ultimately got killed by a cat.)

Nathusius’ pipistrelle नावाचे हे वटवाघुळ मानवाच्या अंगठ्याच्या आकाराचे होते. हे वटवाघुळ रशियाच्या एका गावात सापडले. या वटवाघळाची ओळख पटविण्यासाठी 2016 मध्ये हिथ्रोजवळील कंट्री पार्कमध्ये एक गोल रिंग गळ्यात अडकविण्यात आली होती. डेलीमेलच्या वृत्तानुसार ब्रिटनपासून एवढ्या दूरवर खूप कमी प्राणी गेले आहेत. या वटवाघळाला 30 जुलैला एका अॅनिमल रेस्क्यू टीमने पाहिले. त्याला एका मांजराने जखमी केले होते. 

यानंतर या वटवाघळाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची रिंग पाहिली गेली. तेव्हा हे वटवाघुळ लंडनहून एवढे लांब आले होते, हे समोर आले. या वटवाघळाला तो टॅग लावणाऱ्या ब्रायन ब्रिग्स यांच्या म्हणण्यानुसार, त्याचा प्रवास खूप रोमांचक होता. टॅगमुळे त्यांच्या संरक्षण कार्याचे महत्व किती असते ते समजते. यामुळे प्राण्यांच्या स्थलांतराच्या ट्रेंडचा सखोल अभ्यास करण्य़ासाठी उपयुक्त आहे. 

Nathusius’ pipistrelle च्या स्थलांतराचा पॅटर्न अद्याप समजलेला नाही. काही वटवाघळे ही थंडीच्या काळात पूर्व किंवा पश्चिम युरोपकडून ब्रिटनला येतात. या आधी एक वटवाघूळ 2017 मध्ये लातवियाहून स्पेनला गेले होते. त्याने देखील 2000 किमीपेक्षा जास्त अंतर कापले होते. रशिया आणि ब्रिटनचे तज्ज्ञ एकत्र काम करून यावर संशोधन करत आहेत. 

टॅग्स :russiaरशिया