अनेक सिनेमांमध्ये तुम्ही सुपरहिरोंना गरीब लोकांची मदत करताना पाहिलं असेल. पण ख-या आयुष्यातही एक असाच सुपरहिरो आहे.फ्लोरिडाचा २७ वर्षीय क्रिस वॅन मुक्या जनावरांसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नाही. क्रिस नेहमीच बॅटमॅनच्या पोशाखात दिसतो आणि जनावरांना मदत करण्यासोबतच त्यांना घरीही पोहोचवत आहे. दुसऱ्यांनी सुद्धा असं करावं म्हणून त्याने हा पोशाख निवडला आहे. जेणेकरून तो वेगळा दिसावा आणि जगातील लोकांपर्यंत संदेश पोहोचावा.
क्रिसने याची सुरूवात जनावरांची मदत करणाऱ्या एका संस्थेतून वॉलेंटिअर म्हणून केली होती. २०१८ मध्ये क्रिसने जनावरांच्या मदतीसाठी बॅटमॅन फॉर पॉज या संस्थेची सुरूवात केली. या माध्यमातून त्याने अनेक जनावरांचा जीव वाचवला आणि त्यांचं घर शोधून त्यांना घरी पोहोचवलं. जर त्या जनावरांची घरे नसतील किंवा कुणी मालक नसेल तर ही जनावरे दुस-या लोकांना सोपवली जातात.
जनावरांना आणणे आणि घेऊन जाणे यासाठी क्रिस त्याच्या होंडा अकॉर्डचा वापर करतो. पण त्याला एका अशा व्यक्तीचा शोध आहे, जी या कामासाठी एखादी मोठी गाडी दान करू शकेल. क्रिसनुसार, बालपणी मी जेव्हा सुपरहिरो सिनेमे बघायचो तेव्हा मलाही लोकांच्या मदतीसाठी त्यांच्यासारखं होण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे मी हा मार्ग निवडला.
कधी करतो काम?बॅटमॅनकडे ई-मेल, फोन आणि सोशल मीडियाच्या मदतीने जनावरांना वाचवण्याची रिक्वेस्ट येतात. त्यामुळे क्रिस जनावरांच्या मालकांना शोधण्याचं काम वीकेंडलाही करतो. तर जनावरांना एका ठिकाणाहून दुस?्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या दिवसात करतो.