ऑनलाइन लोकमत
कॅनडा, दि. 8- तुमच्या लिव्हिंग रूममध्ये एकदम 75 हजार साप आढळले तर.. तुमची भीतीनं अगदी गाळण उडेल, मात्र हे चित्र दरवर्षी दृष्टिक्षेपात पडत असतं. जगातील पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेटही देतात. हे एक ठिकाण कॅनडातील मनिटोबा इथं आहे.
मनिटोबामध्ये हजारोंच्या संख्येनं रेड-साइडेड गार्टस साप आढळतात. आठ महिन्यांच्या निद्रेतून हे साप हळूहळू जागे होत आहेत. या भागात चुन्याचे दगड आहेत. कॅनडात मोठ्या प्रमाणात थंडी असून, तापमानही शून्य डिग्री सेल्सियसच्या खाली असते. थंडीच्या मोसमात हजारोंच्या संख्येनं इथं साप येतात. 8 महिने हे साप इथं गाढ झोपेत असतात. या काळात सापांचं पूर्ण लक्ष्य प्रजननावर असतं.
ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते, या सापांसाठी खाण्यापेक्षा प्रजनन खूप महत्त्वाचं असतं. प्रजननानंतर गर्मीच्या मोसमात म्हणजेच तिथल्या ऑगस्ट महिन्यात मादी जातीचा साप पिल्लांना जन्म देतो. दरवर्षी मादी साप अडीच लाखांहून अधिक पिल्लांना जन्म देते.