शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

समुद्रकिनारे निर्मनुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:10 PM

आजवर थायलंडनं इतक्या आपत्तींना तोंड दिलं, पण त्यांचा पर्यटनव्यवसाय कायमच अभेद्य राहिला आणि त्यांची अर्थव्यवस्थाही अगदी रसातळाला गेली नाही. यावेळी मात्र त्यांना फटका बसलाच.

ठळक मुद्देपर्यटकांअभावी लोकांवर भुके मरण्याची वेळ.

- लोकमत न्यूज नेटवर्कथायलंड हा असा देश आहे, ज्याची जवळपास संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. निसर्गसौंदर्यानं संपन्न असलेल्या या देशाला जगभरातले पर्यटकही पहिली पसंती देत असतात. कोरोनाच्या काळात तेथील  पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असला तरी थायलंडला याआधीही अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं आहे. गेल्या 25 वर्षांत अनेक मोठे आघात थायलंडनं पचवले आहेत. 1997ला अर्थव्यवस्थचं पार वाटोळं झालं होतं, 2004ला त्सुनामीचा तडाखा बसला होता, 2006 आणि 2014ला राजकीय अस्थिरतेचा फटका बसला होता, 2008ला एअरपोर्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला होता आणि 2010मध्ये राजकीय हिंसाचारामुळे थायलंडच्या प्रगतीला खीळ बसली होती. पण तरीही या प्रत्येक परिस्थितीत थायलंड तगून गेलं. त्यांचा पर्यटन व्यवसाय टिकून राहिला, नुकसान झालं, पण याही परिस्थितीत देशाला मोठा आधार दिला, तो पर्यटन क्षेत्रानंच. तिथल्या पर्यटनासंदर्भातली आकडेवारीही मोठी बोलकी आहे.  साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1960मध्येही थायलंडला तब्बल 80 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. गेल्या वर्षी, 2019मध्ये पर्यटकांचा हाच आकडा तब्बल चार कोटींपर्यंत गेला  आणि थायलंडच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्रानं आजपर्यंतचा सर्वाधिक वाटाही उचलला. गेल्या वर्षी थायलंडला पर्यटनातून तब्बल साठ अब्ज डॉलरची कमाई झाली.आजवर थायलंडनं इतक्या आपत्तींना तोंड दिलं, पण त्यांचा पर्यटनव्यवसाय कायमच अभेद्य राहिला आणि त्यांची अर्थव्यवस्थाही अगदी रसातळाला गेली नाही. आजही त्यांच्या अर्थव्यवस्थेतला जवळपास 25 टक्के वाटा पर्यटनातून येतो. त्यांची पर्यटनाची ही बाजू अतिशय तगडी असल्यामुळेच थायलंडला ‘टेफलॉन थायलंड’ असंही म्हटलं जातं. म्हणजेच ‘कधीही गंज न चढणारा देश’! अशी या देशाची ओळख आहे, पण कोरोनानं आज थायलंडच्या या बिरुदावलीलाच मोठा धक्का दिला आह. कारण तिथला पर्यटनव्यवसाय एकदम कोलमडून पडला आहे. जगभरातल्या  रसिक पर्यटकांनी कायम भरलेले तिथले समुद्रकिनारे अक्षरश: ओस पडले आहेत. कोणी चिटपाखरूही आज या समुद्रकिनार्‍यांवर दिसत नाही. देशातले बहुसंख्य लोक पर्यटनावर अवलंबून असल्यानं अचानक त्यांच्यावर भुके मरण्याची वेळ आली आहे. सरकार या परिस्थितीवर मात करण्याचा निकराचा प्रय} तर करतंय, पण त्यात लवकर यश येण्याची चिन्हे नाहीत. तात्पुरता उपाय म्हणून सरकारनं विविध कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. त्याचवेळी दूरसंचार कंपन्यांनाही आवाहन केलं आहे, की त्यांनी लोकांना दरमहा दहा जीबी डेटा फ्री द्यावा. त्यामुळे लोकांना किमान एकमेकांच्या संपर्कात राहता येईल! अर्थव्यवस्था सुधारल्यावर या कंपन्यांना त्यांचा परतावा दिला जाणार आहे, पण कधी, हे निदान आज तरी कोणीच सांगू शकत नाही!.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या