शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

मॅनvsवाईल्ड फेम बेअर ग्रिल्सला होतोय पश्चाताप, यापुढे प्राण्यांना न मारण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 7:55 PM

सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्सने आपल्या शोदरम्यान अनेक प्राण्यांना मारुन खालले आहे. पण, आता त्यांना पश्चाताप होत असून, यापुढे कुठल्याही प्राण्याला न मारण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्स जगभरात लोकप्रिय आहे. अनेक देशात बेअर ग्रिल्सचे लाखो चाहते आहेत. त्यांचे सर्व्हायव्हल शो पाहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. Man Vs Wild शो सुरू केल्यानंतर, आता Into the Wild with Bear Grylls हा शोदेखील खूप प्रसिद्ध झाला आहे. या शोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.

प्राण्यांना मारुन खाणार नाहीहा शो एक सर्व्हायव्हल शो असून, निर्जन आणि घनदाट जंगलात एकटे कसे जगायचे हे यात शिकवले जाते. खाण्यापिण्याची सोय नसताना बेअर ग्रिल्स अनेक वेळा शोमध्ये जंगली फळे आणि साप-विंचवासह अनेक प्राणी खाताना दिसले आहे. पण, आता बेअरला आपल्या कामाचा पश्चाताप होत आहे. एका मीडिया हाउसला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये बेअरने यापुढे कुठल्याही प्राण्याला मारणार नसल्याचे म्हटले आहे. 

शाकाहारी लोकांकडून प्रेरणा मिळालीयाबाबत बेअर म्हणाला, 'माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी जगण्याच्या नावाखाली खूप प्राण्यांना मारले. पण, आता मी त्यापासून खूप दूर आलो आहे. माझ्या शोमध्ये अनेक शाकाहारी लोक येऊन गेले, त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. यामुळेच आता मी प्राण्यांना न मारण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मी फक्त आधीच मेलेले प्राणी खाणार,'अशी माहिती बेअर ग्रिल्सने दिली.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शोमध्ये आले आहेत

विकी कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासह अनेक भारतीय स्टार्सनी बेअर ग्रिल्सच्या शो 'इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'मध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बेअर ग्रिल्ससोबत शोमध्ये दिसले आहेत. 

बेअर ग्रिल्स यूकेच्या स्पेशल फोर्सचा भाग होते

बेअर ग्रिल्स हे यूकेच्या स्पेशल फोर्सचे माजी अधिकारी आहेत. ते 90 च्या दशकात यूकेच्या विशेष दलाचा भाग होते. त्यांनी ट्रॉपर, सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर आणि पेट्रोल मेडिक म्हणूनही काम केले आहे. त्याच्या संपूर्ण टीव्ही कारकिर्दीत, त्यांनी 'Into the Wild with Bear Grylls', 'Man vs Wild', 'You vs Wild', 'The Island', 'Escape from Hell', 'Running Wild with Bear Grylls', 'Bear Grylls' हे शो केले आहेत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके