शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

By सायली शिर्के | Published: September 23, 2020 12:14 PM

ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत धक्कादायक खुलासा केला असून व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता यामध्ये WHO चा देखील हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णाच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत असताना काही दिवसांपूर्वी चीनमधून पलायन केलेल्या वैज्ञानिकाने मोठा खुलासा केला होता. चीनमधील हाँगकाँग शहरातील हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे जेष्ठ वायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत धक्कादायक खुलासा केला असून व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता यामध्ये WHO चा देखील हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

चीनने कोरोना प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा देखील हात असल्याचा आरोप आता डॉ. ली मेंग यान यांनी केला आहे. WIONला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हा दावा केला आहे. वुहानमध्ये हा व्हायरस समोर आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र चीनेने हे प्रकरण दाबण्यासाठी एक कव्हर-अप ऑपरेशन सुरू केलं. लोकांना याबाबत माहिती मिळण्याआधी चीनी सरकारला याचा अंदाज होता. जागतिक आरोग्य संघटना देखील या प्रकरणाच्या 'कव्हर अप'चा भाग असून हे प्रकरण दाबण्यात WHO चा हात असल्याचा आरोप यान यांनी आता केला आहे.

"कुटुंबीयांना धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सुरू "

"चीनी सरकार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करत आहे. सायबर अटॅक करण्यात येत असून कुटुंबीयांना धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे" असा दावा देखील मुलाखतीत डॉ. ली मेंग यान यांनी केला आहे. जीवघेणा कोरोना व्हायरस चीनच्या वेट मार्केटमधून पसरल्याचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार

ताइवानी वृत्तसंस्थेला माहिती देताना लाईव्ह स्ट्रीमदरम्यान डॉ ली मेंग यान यांनी ''ही माहामारी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून मी विश्लेषण सुरू केले होते की, चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या मिलिट्री प्रयोगशाळेतून हा व्हायरस पसरला होता. ही बाब लपवण्यासाठी वुहानच्या वेट मार्केटची कहाणी रचण्यात आली.  वरिष्ठ अधिकारीवर्गाने  ही बाब अजुनही गांभीर्याने घेतलेली नाही'' असं सांगितलं होतं.

''चीनी कम्यूनिस्ट पार्टीविरुद्ध बोलल्यानंतर आम्हाला कधीही तडीपार केलं जाऊ शकतं. सध्या हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थकांसोबत हा प्रकार केला जता आहे. त्यामुळे मी माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. '' वायरोलॉजिस्ट डॉ ली मेंग यान एप्रिल महिन्यात अमेरिकेत आल्या. कारण त्यांना चीनी सरकारकडून अटक होण्याची भीती होती.  चीनी सरकारला बरखास्त करण्यासाठी चीनच्या स्थानिक लोकांनी मदत करण्याचं काम सुरू ठेवणार असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेचा यामध्ये हात असल्याचा दावा केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र

CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! देशात 83,347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 56 लाखांवर

"...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध"

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा

"मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यूWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना