लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा चॉकलेट खूप आवडतं. चॉकलेट आवडत नाही असं म्हणणारे फार कमी लोक सापडतील. असं असताना आता चॉकलेटबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चॉकलेटमुळे नवं संकट निर्माण झालं असून बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरतं आहे. तब्बल 11 देशांमध्ये याची प्रकरणं सापडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एक चॉकलेट जीवघेणं ठरत असल्याने सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोप आणि अमेरिकेत बॅक्टेरियल इन्फेक्शन वेगाने पसरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होणारी ही प्रकरणं बेल्जिअम चॉकलेटमुळे पसरत असल्याचं WHO ने म्हटलं आहे. बेल्जिअममध्ये तयार झालेल्या या चॉकलेट्सचा पुरवठा तब्बल 113 देशांमध्ये झाला आहे. आतापर्यंत 11 देशांत या चॉकलेटमुळे 151 लोक आजारी पडले आहेत. 151 पैकी 150 प्रकरण युरोपातील तर एक प्रकरण यूएसमधील आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ईस्टरमध्ये चॉकलेट पुरवठा जास्त झाला होता, अशात ही प्रकरणं वाढू शकतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
Salmonella Typhimurium (S. Typhimurium) नावाचा हा बॅक्टेरिया आहे. अस्वच्छ पाणी किंवा खाद्यपदार्थांमुळे हे इन्फेक्शन होतं. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची प्रकरणं जास्त आहे. 21 लोकांना गंभीर आजार झाला आहे. 12 लोकांना रक्तस्राव झाला आणि 9 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यामुळे अद्याप कुणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त नाही. पण यूकेच्या आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार तपासात या बॅक्टेरियामुळे पसरणाऱ्या आजारावर अँटिबायोटिक्सही काम करत नाही आहेत.
बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे ताप, पोटदुखी, उलटी अशी लक्षणं दिसून येतात. जेवण केल्यानंतर 6 ते 72 तासांत ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2022 मध्ये बेल्जिअमच्या अर्लोनमधील फेरेरो कॉर्पोरेट प्लांटमध्ये हा बॅक्टेरिया सापडला होता. इथं किंडरचे प्रोडक्ट बनवले जातात. आवश्यत ती स्वच्छता केल्यानंतर, खबरदारी घेतल्यानंतर आणि इन्फेक्शनचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर इथं बनलेले प्रोडक्ट्स वितरीत करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'या' ठिकाणी सापडले बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे रुग्ण
- बेल्जियम (26 cases) - फ्रान्स (25 cases) - जर्मनी (10 cases) - आयरलँड (15 cases) - लक्जमबर्ग (1 case) - नेदरलँड (2 cases) - नॉर्वे (1 case) - स्पेन (1 case)- स्वीडन (4 cases) - युनायटेड किंगडम (65 cases) - यूएसए (1 case)