येरुशलेम: इस्त्रायलमध्ये पुन्हा बेंजामिन नेतन्याहू यांची सत्ता आली आहे. या देशात एवढी अस्थिरता आहे की गेल्या पाच वर्षांत चारवेळा निवडणुका झाल्या आहेत. परंतू, कोणालाच स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने काही महिन्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी लागत होती. यावेळी नेतन्याहू यांनी मोठा विजय मिळविला आहे.
नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. २०२१ पर्यंत नेतन्याहू सत्तेत होते. नेतन्याहूंचा विजय झाल्याचे समजताच गाझा पट्टीकडून इस्त्रायलवर चार मिसाईल डागण्यात आली. यामध्ये नुकसानीची माहिती समोर आलेली नसली तरी एक एक तासाच्या अंतराने ही चार मिसाईल डागल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
फिलिस्तीनी जिहादींनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी गाझा सीमेजवळील किसुफिम, ऐन हशलोशा आणि नीरिम या शहरांना रॉकेट सायरनने सतर्क केले. आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रॉकेट हल्ले रोखण्यात आले. नेतन्याहू यांच्या पक्षाला जवळपास ६४ जागांसाठी बहुमत मिळाले आहे. १२० जागांसाठी ही निवडणूक झाली. सत्तेत येण्यासाठी ६१ जागांची आवश्यकता असते. अद्याप काही मते मोजायची होती. परंतू चार जागांसाठी विरोधकांना एकूण मतांपैकी ३.२५ मते मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळे नेतन्याहू यांच्या आघाडीकडे सत्तेत जाण्याएवढी आघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया...इस्रायलमधील लोक कधीही कोणत्याही उमेदवाराला मत देत नाहीत, तर ते पक्षाला मतदान करतात. जर संसदेत खासदार हवा असेल तर एका जागेसाठी पक्षाला राष्ट्रीय मताच्या किमान 3.25% मते मिळावी लागतात. त्याच्या गुणोत्तरामध्ये खासदारांची संख्या वाढविता येते. इस्त्रायलमध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असलेली निवडणूक प्रक्रिया आहे. पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या संख्येनुसार जागा मिळतात.