Israel Politics: मोसादसोबतच्या संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये (Israel) मोठा उलटफेर झाला आहे. अध्यक्ष बदलल्यानंतर आता इस्त्रायलमध्ये नरेंद्र मोदींचे (PM Narendra modi) मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) युगाचा अस्त झाला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट होत नवीन सरकार बनविण्याची घोषणा केली आहे. यामुळे नेतन्याहू यांना बऱ्याच वर्षांपासूनची सत्ता सोडावी लागणार आहे. (Israel's opposition leader on Thursday moved closer to unseating Prime Minister Benjamin Netanyahu after reaching an agreement with a coalition of diverse political allies to form a new government. )
इस्त्रायलमधील निवडणुकीचा निकाल....Israel Election Result: मोठा पेच! इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू जिंकले, पण बहुमत नाही; अरबांचा 'राम' ठरला किंगमेकरमहत्वाचे म्हणजे सात खासदारांचा पाठिंबा असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदा मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती. यामुळे नेतन्याहू हे काळजीवाहू पंतप्रधान होते. नेतन्याहू यांच्या पक्षाला दोन नंबरच्या जागा मिळाल्या होत्या. तरी देखील इस्त्रायलचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांना सरकार बनविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 जूनपर्यंतचा वेळ दिला होता.
सरकार बनविण्यासाठी नेतन्याहू यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. याचवेळी विरोधी पक्ष नेते येर लेपिड यांनी इस्त्रायलमध्ये विरोधी पक्षांमध्ये सरकार बनविण्यासाठी सहमती बनल्याचे जाहीर केले. या नव्या आघाडीमध्ये आठ पक्ष सहभागी आहेत. या साऱ्यांच्या सहमतीनुसार सामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट इस्त्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. त्यांचा कालावधी हा दोन वर्षांचाच असणार असून यानंतर येश एटिड पक्षाचे नेते येर लेपिड त्यानंतर पंतप्रधान होणार आहेत.
राम ठरला किंगमेकरनिवडणूक निकालानंतर 'राम' (Raam) नावाचा कट्टर अरब इस्लामिक पक्ष तिथे किंगमेकर बनला होता. बहुमतासाठी नेतन्याहू यांना 61 जागांची गरज होती. युनायटेड अरब लिस्ट, ज्याला हिब्रू भाषेत राम म्हटले जाते, हा पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या नेतन्याहूंचे भविष्य ठरविणार होता. विरोधी पक्षाचे नेते येर लेपिड यांनी संरक्षण मंत्री बेनी गांट्ज यांच्या सहयोगाने गेल्या वर्षी निवडणूक लढविली होती. मात्र, नेतन्याहू आणि गांट्ज यांच्यामध्ये सत्ता समीकरणे बनली आणि ते मागे हटले. आता पुन्हा येर लेपिड यांनी नेतन्याहूंना हरविण्य़ाचा दावा करत प्रचार केला होता. राम पक्ष हा इस्त्रायलमधील अरब लोकांचे नेतृत्व करतो. यहुदी बहुल असलेल्या या देशात अरब मुस्लिमांची लोकसंख्या जास्त नाहीय. त्यांच्यातील अनेकजण वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतात. राम पक्षाला पाच जागांवर विजय मिळणे हे पहिल्यांदाच घडले आहे.