वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संपूर्ण अमेरिकेत आणि जगभरात पर्युषण पर्वाचे पालन करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते आपल्या संदेशात म्हणातात, पर्युषण पर्व हे मनन, विनम्रता आणि प्रायश्चित्तासाठी आहे. या पृथ्वीवरील आमच्या अल्पकाळाच्या वास्तव्यातील प्रत्येक हालचाल ही एकमेकांची काळजी घेणे आणि प्रत्येकाच्या उद्याच्या दिवसाला चांगला आकार देण्याचे प्रतिनिधित्व करते हे वैश्विक सत्य आहे. हा पवित्र उत्सव आम्हाला एकाच मानवतेत घट्ट ओवणारी आशा आणि करुणेचे प्रतिबिंबच आहे. अनुभवांचा समृद्ध साठा, अभिव्यक्ती आणि मुळे यांनी आमच्या जगाला समृद्ध केल्याचे स्मरण यानिमित्त होते.तसेच आम्ही कोण आहोत, आम्ही कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, इजा होण्यापासून मुक्त आहोत आणि प्रतिष्ठा आणि आदर कसा राखायचा याची आम्हाला पूर्ण कल्पना येते. या संपूर्ण आठ दिवसांत माझ्या तुम्हाला चिरंतन आशीर्वाद आणि ऐक्यासाठी शुभेच्छा!
पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा
By admin | Published: August 31, 2016 4:15 AM