लंडन : अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, राहणीमान, पर्यावरण आणि प्रशासन व्यवस्थेबाबत ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने मंगळवारी जाहीर केलेल्या १००० जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये दिल्लीने पहिला क्रमांक मिळविला आहे. अनेक बाबींमध्ये दिल्लीनेमुंबईला मागे टाकले असले, तरी पर्यावरणाबाबत दिल्लीची स्थिती मात्र वाईट असल्याचे अहवालात म्हटले आहे.
१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे.
भारतातील टॉप १० शहरेशहर (जा.क्र) अर्थव्यवस्था मनुष्यबळ राहणीमान पर्यावरण प्रशासनदिल्ली (३५०) १०८ ५१ ८३८ ९७३ ३८० बंगळुरू (४११) १७१ १७९ ८४७ ७२७ ३८० मुंबई (४२७) १६९ १२६ ९१५ ८१२ ३८० चेन्नई (४७२) २४४ १८९ ८७९ ७६३ ३८० कोची (५२१) २५९ ५६० ७६५ ७९० ३८० कोलकाता (५२८) १६६ ३९२ ८८४ ९१९ ३८० पुणे (५३४) ३८६ १८१ ८९७ ७१३ ३८० त्रिशूर (५५०) ३२६ ६९८ ७५७ ५८१ ३८० हैदराबाद (५६४) २५२ ५२४ ८८२ ६७४ ३८० कोझीकोडे (५८०) ३९२ ६०७ ७८३ ६२० ३८०
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर शहर सर्वांत खालच्या म्हणजे १००० व्या स्थानावर आहे. जागतिक शहरे निर्देशांकात १६३ वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या जगातील १००० प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोणती शहरे? नागपूर (७४४), वसई-विरार (७४८), अमरावती (८१५), नाशिक (८२६), छत्रपती संभाजीनगर (८४२), सोलापूर (८४८), कोल्हापूर (८७७), सांगली (९४३)