टोकियो : चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्या देशाच्या रक्षणासाठी पूर्ण क्षमतेने उतरेल, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन यांनी चीनला प्रथमच थेट इशारा दिला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तैवानच्या रक्षणाची जबाबदारी वाढल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.क्वाड राष्ट्रांच्या बैठकीसाठी टोकियोमध्ये दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तैवानसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले की, हाेय, आम्ही तसे आश्वासन दिले आहे. चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी कारवाईने तैवानच्या रक्षणासाठी उतरेल. तैवानच्या सीमेजवळ लढाऊ विमानांचे उड्डाण आणि घुसखाेरीसह इतर कारवाया करून चीन धाेक्याशी खेळत आहे. आम्ही ‘एक-चीन’ धाेरणावर स्वाक्षरी केली आहे, असे बायडेन म्हणाले
nगेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेच्या काेणत्याही राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यांपैकी हे एक वक्तव्य असल्याचे मानले जात आहे. nअमेरिकेने तैवानला संरक्षणाची अशा प्रकारची हमी देण्याचे आतापर्यंत टाळले आहे. अमेरिकेने १९७९ मध्ये तैवानसंबंधी कायदा केला आहे. मात्र, त्यानुसार सैन्य उतरवून तैवानचे रक्षण करण्याची गरज नाही. तसेच या कायद्यानुसार अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येताे.
भीती वाढलीचीनने कायमच तैवानला आपला भूभाग असल्याचे म्हटले आहे, तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानताे. रशिया-युक्रेन युद्धानंतर चीन तैवानवर हल्ला करण्याची भीती वाढली आहे. तैवानवरून चीननेही अमेरिकेला विस्तवाशी खेळत असल्याचा इशारा यापूर्वी दिला हाेता.
ऑडिओ क्लिम व्हायरलनुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यामध्ये वरिष्ठ चिनी अधिकारी तैवानवरील हल्ल्याबद्दल चर्चा करीत आहेत. ही चर्चा समोर आल्यानंतर बायडेन यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी आणखी वाढली आहे. चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी मदत घेऊन तैवानचे रक्षण करील.
बळाचा वापर करून तैवानचा ताबा घेण्याचा विचार करणे अनुचित आहे. चीनने तसे पाऊल उचलल्यास ते चुकीचे ठरेल. तसेच संपूर्ण क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण हाेईल, - जो बायडेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
चीनचा पलटवारबायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चिनी लोकांच्या दृढनिश्चयाला आणि इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नये. ते पुढे म्हणाले की, तैवान चीनचा भाग आहे. हा मुद्दा चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या मूळ हितसंबंधित मुद्द्यांवर चीन कोणतीही तडजोड करणार नाही.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? ही क्लिप चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लीक केली, ज्यांना शी जिनपिंग यांची तैवानवर हल्ला करण्याची योजना उघड करायची होती. अधिकारी या क्लिपमध्ये सांगत आहेत की, कोणत्या कंपन्यांना ड्रोन, बोटी बनवण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. याशिवाय हल्ल्याच्या तयारीवरही यात चर्चा झाली.