सध्या सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी भर स्टेडियममध्ये चारचौघांत बॉयफ्रेंडला थपडा मारताना दिसत आहे. बॉयफ्रेंडने प्रपोज करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमुळे तीन नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या बॉयफ्रेंडने स्टेडियममध्ये सर्वांसमक्ष प्रपोज करायचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच क्षणी संतापलेल्या या तरुणीने त्याच्यावर थपडांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. ती तेवढ्यावरच थांबली नाही. तिने त्याच्या तोंडावर कोल्डिंक्सही फेकली. हा व्हिडीओ आता इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
अमेरिकन तरुण अलेक्झँडर कोर्डा हा तिच्या गर्लफ्रेंडसोबत बेसबॉलचा सामना पाहत होता. स्टेडियम खचाखच भरलेले होते. तेवढ्यात कोर्डा याने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. आधी कोर्डा याने तिला किस केले. त्यानंतर गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज करू लागला.
गर्लफ्रेंड हसत होती. आजूबाजूचे लोकही चिअर करत होते. एवढ्यात कोर्डा याने खिशातून एक बॉक्स काढला. गर्लफ्रेंडला वाटलं त्यात रिंग असेल. मात्र त्यामध्ये रिंगच्या जागी लॉलीपॉप कँडी होती. कँडी रिंगबाबत कोर्डा गर्लफ्रेंडला प्रपोज करत होता. ते पाहून गर्लफ्रेंड भडकली आणि तिने कोर्डावर थपडांचा वर्षाव केला. एवढंच नाही तर त्याने कोर्डावर ड्रिंक्ससुद्धा फेकली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला.
आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत. आहे. तसेच तो लाखो लोकांनी पाहिला आहे. काही युझर्स हा व्हिडीओ म्हणजे प्रँक असल्याचे सांगत आहेत. तर अनेकजण तरुणीचं वर्तन चुकीचं असल्याचं सांगत आहेत. तर काही जण या तरुणाने चुकीच्या ठिकाणी गंमत करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.