गेल्या काही दिवसांपासून चीनच्या कुरघोड्यांमुळे लडाख सीमेवरील तणाव वाढला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोडींना प्रत्युतर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. मात्र भारताचे चीनसोबत सीमेवादवरुन सुरु असलेल्या संघर्ष दरम्यान नेपाळने देखील भारताचे तीन प्रदेश देशाच्या नकाशात घेऊन भारताकडे डोळे वटारले आहेत. परंतु चीन, नेपाळ पाठोपाठ आता भूतानकडूनही भारताची अडवणूक केली जात आहे.
भारतातील आसाम सीमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणारं कालव्याचं पाणी रोखण्याचा निर्णय भूतानने घेतला आहे. भूतानच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे.
स्थानिक माहितीनुसार, १९५३ पासून भूतानकडून आसाम सीमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धान पिकासाठी मानवनिर्मित सिंचन वाहिनीमधून पाणी सोडण्यात येत होतं. मात्र भूतान सरकारच्या नुकत्याच झालेल्या पाणी रोखण्याच्या निर्णयाने आसाममधील तब्बल २५ गावांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भूतानच्या या निर्णयाविरोधात सीमेवरील शेतकरी आंदोलन करत आहे.
CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
तत्पूर्वी, भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम देखील नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. पूर्वी चम्पारण जिल्हा मुख्यालयापासून 60 किमीवर याच नदीवर एका बांध आहे. तो इंग्रजांनी पूर रोखण्यासाठी बांधला होता. मात्र, 2017 मध्ये आलेल्या महापुरामुळे दोन्ही देशांदरम्यान वाद सुरु झाला आहे. हा बंधारा वेळोवेळी पुनर्निर्माण केला जात होता. मात्र नेपाळने हे काम रोखल्याने आता पुराचा धोका वाढला आहे. नेपाळच्या अडवणुकीमुळे बिहारचा मोठा भाग महापुराच्या संकटात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला
"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा
"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला
मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...