शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

‘बिग डेटा हब’ने बदलला अविकसित राज्याचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:22 AM

चंद्रावरून डोळ्यांनी दिसणारी एकमेव मानवनिर्मित गोष्ट म्हणजे चीनची भिंत.

- टेकचंद सोनवणेगुइयांग (चीन) : चंद्रावरून डोळ्यांनी दिसणारी एकमेव मानवनिर्मित गोष्ट म्हणजे चीनची भिंत. या बलाढ्य भिंतींमागील हा देश आपल्यासाठीच गूढच. या विकसित शहराच्या गर्दीत एक राज्य चीनमध्ये गेली अनेक वर्षे दारिद्रयात खितपत पडले होते. ते म्हणजे गुझाओ. भरपूर जलसाठे आणि नैसर्गिक विविधता. चहुबाजूंनी अवघे गुझाओ राज्यच डोंगरदऱ्यांनी वेढलेले. नैसर्गिक साधनसंपत्ती इतकी वैविध्यपूर्ण की पर्यावरणाचा ºहास करून इतर राज्यांसारखा विकास करणे परवडले नसते. त्यामुळे येथील प्रजा दारिद्रयात त्यामुळे खितपत पडली होती. गरिबी वाढतच राहिली. इतकी की २०१७ साली केलेली पाहणीनुसार २० लाख ८० हजार स्थानिक नागरिक दारिद्रयरेषेखाली होते. म्हणजे दिवसाला अगदी ३५ रुपयात एका कुटुंबाला गुजराण करावी लागेल, अशी वाईट अवस्था. २०१५ साली या राज्यात केवळ चार उद्योग होते. वीज, कोळसा, तंबाखू नि मद्य उत्पादन.त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर वाढतच राहिले. तत्कालीन राष्ट्रपती हु जिंताव यांनी गुझाओला विकासाच्या कक्षेत आणण्यासाठी योजना जाहीर केली. पण ठोस काही घडले नाही. मुहूर्त सापडला ५ जी तंत्रज्ञानाच्या युगात. बिग डेटा हब उभारण्याच्या निर्णयातून.जिंताव यांच्यानंतर राष्ट्रपती झालेल्या शी जिनपिंग यांनी ही योजना पुढे नेली.राज्य सरकारदेखील सक्रिय झाले. देशाच्या आयटी क्षेत्राच्या तुलनेत इतर राज्यांपेक्षा गुझाओ ३७ टक्के जास्त गतीने विकसित झाले. सर्वात आधी जागा निवडून जगभरातल्या १६ हजार आयटी कंपन्यांना निमंत्रण पाठवले. १५५ संशोधन कंपन्याही आल्या.पूर्ण चीनमधून ८५ हजार व्यावसायिक सहभागी झालेत. त्यातून उभे राहिले ५ जी बिग डेटा हब. अगदी अ‍ॅपलने देखील वापरकर्त्यांचा डेटा याच शहरात साठवायला सुरुवात केली.।‘कलरफुल क्लाउड’ सुरु : गुझाओ राज्याची राजधानी गुइयांग आता डेटा हब झाले. डेटा हब उभारायचे असेल तर स्थानिक प्रसारमध्यमांना माहितीचा एक्सेस देणे, लोकांना सहभागी करून घेणे यासाठी राज्यासाठी क्लाउड (माहिती साठवण केंद्र म्हणूयात) सुरू केले. त्यासाठी कंपनी उभारली. कलरफुल क्लाउड. राज्यभरात जे काही सुरू असेल त्याची माहिती सोशल मीडियावरून घेतली जाते. ट्रेंडिंग विषय निवडले जातात. राज्यभरात कुठे काय सुरू आहे, याची माहिती ११ राष्ट्रीय तर ३० प्रादेशिक प्रसारमाध्यमाना दिली जाते. वर्षभरापूर्वी डेटा क्लाउड उभारण्यात आला.।करात सूट,पाच वर्षे बिनभाड्याची जागा दिल्यावर एपल, सॅमसंग या विदेशी तर अलिबाबा, शओमी, हुवाऐ या देशी मोबाईल उत्पादक कंपन्यांनी येथे क्लाउड उभारले. या कंपन्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा आता इथेच साठवला जाईल. भारतही यात सहभागी असेल.