जपानमध्ये वर्षाची सुरुवात मोठ्या भूकंपाने झाली आहे. पश्चिम जपानमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ मॅग्निट्युट एवढी नोंदवली गेली आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.यानंतर आता जपानमधील भारतीय दुतावास अॅक्शनमोडमध्ये आले आहे. जपानमध्ये असलेल्या भारतीयांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा
मध्य जपानमध्ये आज झालेल्या ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटा अनेक किनारी शहरांपर्यंत पोहोचल्या आहेत. जपानच्या काही भागांमध्ये उड्डाणे आणि रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या आहेत, पण अणुऊर्जा प्रकल्पाला आतापर्यंत नुकसान झालेले नाही. दरम्यान, जपानमधील भारतीय दूतावासाने तीव्र भूकंप आणि त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना नागरिकांना आदेशांचे पालन करण्यास सांगितले आणि चेतावणी दिली की सुरुवातीच्या भूकंपानंतर अधिक शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी लाटा येऊ शकतात.
सोमवारी उत्तर-मध्य जपानला ७.६ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर, देशाच्या हवामान संस्थेने इशिकावा आणि तोयामा प्रांतांसाठी आणखी एक भूकंपाचा इशारा जारी केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हयाशी योशिमासा यांनी उत्तर-मध्य जपानला झालेल्या ७.६ तीव्रतेच्या भूकंपानंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी देशाच्या अणुऊर्जा प्रकल्पात कोणतेही नुकसान झाले नाही याची पुष्टी केली.