लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे.मोहनदास करमचंद गांधी यांनी आपल्या १९ व्या जन्मदिनापूर्वी कायद्याची पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला पोहोचले होते आणि असे सांगितले जाते की, ते लवकरच लंडनच्या जीवन शैलीशी एकरूप झाले. प्रमुख ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी म्हटले आहे की, मोहनदास गांधी यांना लंडन खूपच आवडले होते. देसाई हे ब्रिटनमधील भारतीय शिक्षक आहेत आणि महात्मा गांधी यांच्या नावाने अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. ते गांधी स्टॅच्यू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.देसाई यांनी म्हटले आहे की, तीन वर्षांनंतर ते येथून गेले तेव्हा एक वकिलाच्या स्वरूपात एक विश्वासू व्यक्ती बनले होते. जुन्या रेकॉर्डवरून असे दिसून येते की, गांधी यांचे येथील स्थानिक लोकांशी जवळीकता होती. शाकाहारी भोजनाच्या शोधात महात्मा गांधी हे अनेक विचारांच्या लोकांच्या जवळ आले. यात समाजवादी आणि ख्रिश्चनही होते.‘द व्हिक्टोरिया’मध्ये होते वास्तव्यट्राफलगर स्क्वेअरच्या जवळ ‘द व्हिक्टोरिया’ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये काही काळापर्यंत महात्मा गांधी थांबले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायोगाने येथे ‘व्हॅल्यूज अॅण्ड टीचिंग्स आॅफ महात्मा’ यावर विशेष चर्चेचे आयोजन केले आहे.‘गांधींचे अहिंसा तत्त्वज्ञान महत्त्वाचे’जगात आज मतभेद वेगाने वाढत असताना आणि लोक सहज अपराध करीत असताना अशा काळात महात्मा गांधी यांचे अहिंसा तत्त्वज्ञान हे महत्त्वाचे ठरते, असे मत सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लूंग यांनी व्यक्त केले.सिंगापूरमध्ये महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी करण्यात येणार आहे. ली सिन लूंग म्हणाले की, महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान आजही आमच्यासाठी ऋषितुल्य सल्ला आहे. आम्हाला आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करायला हवेत की, मतभेद शांततेने सोडविले जावेत. दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान करायला हवा.जीवनशैलीआगामी आठवड्यात आॅक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांत गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. मात्र, लंडनमध्ये सर्वात जास्त कार्यक्रम होतील. कारण, हे असे शहर आहे जे महात्मा गांधी यांना खूपच आवडत होते. पोरबंदरचा हा तरुण लंडनची जीवनशैली आत्मसात करण्यासाठी खूपच उत्सुक होता.
गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 4:40 AM