अबुजा - नायजेरियामधील इमो या दक्षिणेकडील राज्यात एका अनधिकृत रिफायनरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की त्याचा आवाज खूप लांबपर्यंत ऐकू गेला. तसेच धुराचा मोठा लोट उठलेला दिसला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हा स्फोट शुक्रवारी रात्री उशिरा एगबेमा येथील स्थानिक सरकारी क्षेत्रामध्ये अनधिकृत तेल रिफायनरीमध्ये झाला. ही रिफायनरी इमो आणि नदियोच्या दक्षिणेकडील राज्यांमधील सीमारेषा आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, आतापर्यंत १० पेक्षा अधिक लोक मारले गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
इमोमधील पेट्रोलियम संपत्तीचे कमिश्नर गुडलक ओपिया यांनी सांगितले की, एका अनधिृत बंकरिंगच्या ठिकाणी आग लागल्याने १०० हून अधिक लोक प्रभावित झाले. ज्यांची ओळख आतापर्यंत पटू शकलेली नाही. ओपिया यांनी सांगितले की, अनधिकृत तेल रिफायनरीचा ऑपरेटर फरार आहे.
इमोमध्ये तेल आणि गॅस उत्पादन क्षेत्रातील सर्वोच्च परिषदेच्या एका समुदायाचे नेते आणि अध्यक्ष जनरल कोलिन्स एजी यांनी सांगितल्या प्रमाणे इमो आणि नदियोच्या राज्यांदरम्यान, जंगलामध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना दुर्दैवी आहे. आतापर्यंत १०८ जळालेल्या मृततेहांची मोजणी झाली आहे.