शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 8:41 AM

रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत. 

युक्रेनवर पहिल्याच दोन दिवसांत विजय मिळविण्याच्या इराद्याने रशियाने केलेला हल्ला फसला आहे. आता दीड वर्ष झाले तरी युक्रेनच्या मोठ्या भूभागावर कब्जा करता आलेला नाहीय. युद्ध थांबवले तर नाचक्की आणि सुरु ठेवले तरी नाचक्कीच अशा पेचात सापडलेल्या रशियामध्ये रातोरात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांची सत्ता उलथवून लावली जाण्याची भीती सतावू लागली आहे. यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनच्या सुरक्षेसाठी मॉस्कोत रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचाच खाजगी मिलिशिया वॅगनर ग्रुप त्यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी बंडाचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती पुतीन यांना वाटू लागली आहे. रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत. 

युक्रेनमधील बाखमुट येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामुळे या संघटनेचा प्रमुख येवगेनी प्रीगोझिन संतापला आहे. त्याने यासाठी क्रेमलिनला जबाबदार मानले आहे. यासाठी रशियाला शिक्षा आणि सूड उगवण्याची शपथही त्यांनी घेतली आहे. वॅगनरचे डझनभर सैनिक मारले गेले आहेत. आम्ही मॉस्कोकडे कूच करत आहोत. जो कोणी आमच्या केंद्रात प्रवेश करेल तो यासाठी जबाबदार असेल, असे त्याने म्हटले आहे. 

वॅगनर गटाच्या सैनिकांनी नोव्होचेरकास्कच्या मार्गावरील पहिली चौकी आधीच ओलांडली आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय नोवोचेरकास्क येथे आहे. त्यानंतर मॉस्कोच्या रस्त्यावर चिलखती वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमेरिकाही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. रशियन स्पेशल फोर्सने मॉस्कोभोवती नाकाबंदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रशियाची महत्त्वाची लष्करी चौकी रोस्तोवमध्ये रणगाडे आणि चिलखती वाहने दिसली आहेत. याआधीच्या फुटेजमध्ये एक चिलखती वाहनांचा ताफा पुतीन यांना आणीबाणीच्या बैठकीसाठी क्रेमलिनला घेऊन जात असल्याचे दिसले. पुतिनच्या जवळच्या श्रीमंत लोकांमध्ये दहशत पसरली आहे. मॉस्कोजवळील फ्रायझिनो येथे आज रात्री एक लष्करी युनिट जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन