France Submarines Russia: युरोपियन समुद्रात मोठ्या हालचाली! फ्रान्सने तीस वर्षांनी तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:41 AM2022-03-24T11:41:42+5:302022-03-24T11:42:01+5:30

युक्रेनची राजधानी कीववर अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढू लागला आहे. हताश झालेले पुतीन कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेण्य़ाची शक्यता आहे. दोन दिवसांता त्यांना युक्रेन ताब्यात घ्यायचे होते, महिना झाला मोठे नुकसान झाले तरी युक्रेन ताब्यात आलेले नाही.

Big movements in the European sea! Thirty years later, France has deployed three nuclear-armed submarines same time Russia ukraine War | France Submarines Russia: युरोपियन समुद्रात मोठ्या हालचाली! फ्रान्सने तीस वर्षांनी तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या

France Submarines Russia: युरोपियन समुद्रात मोठ्या हालचाली! फ्रान्सने तीस वर्षांनी तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या

googlenewsNext

युक्रेनवरील युद्धाला तीस दिवस लोटले असून हे युद्ध आता महायुद्धात परिवर्तित होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी महायुद्ध सुरु होण्याची शक्यता वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युरोप दौऱ्यावर आले असून नाटोसोबत महत्वाची बैठक होणार आहे. या साऱ्या घडामोडींवर फ्रान्सने युरोपियन समुद्रात तीन अणुबॉम्बचा मारा करू शकणाऱ्या पाणबुड्या तैनात केल्याने खळबळ उडाली आहे. 

युक्रेनची राजधानी कीववर अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढू लागला आहे. हताश झालेले पुतीन कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेण्य़ाची शक्यता आहे. दोन दिवसांता त्यांना युक्रेन ताब्यात घ्यायचे होते, महिना झाला मोठे नुकसान झाले तरी युक्रेन ताब्यात आलेले नाही. यामुळे आता त्यांच्या फौजांनी भात्यात असलेली सर्व शस्त्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. या भीतीमुळे फ्रान्सने सुमारे तीन दशकांनी तीन अजस्त्र पाणबुड्या समुद्रात उतरवल्या आहेत. 

एवढेच नाही तर अण्वस्त्रवाहू मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. शीतयुद्धानंतर तीस वर्षांनी अशी पहिलीच वेळ आहे जेव्हा फ्रान्सने तिन्ही पाणबुड्या एकाचवेळी तैनात केल्या आहेत. फ्रान्सच्या या Triomphant क्लासच्या पाणबुड्या आहेत. या पाणबुड्या अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. ४ पैकी दोन पाणबुड्या आपल्या तळावरून निघाल्या असल्याचे वृत्त आले आहे.

फ्रान्सची एक पाणबुडी समुद्रात आधीपासूनच गस्त घालत आहे. या पाणबुड्यांवर फ्रान्सच्या अध्यक्षांचे अधिकार चालतात. एका पाणबुडीमध्ये १६ अण्वस्त्रसज्ज मिसाईल असतात. हे अणुबॉम्ब १५० किलोटन वजनाचे असतात. या मिसाईलची मारक क्षमता ६००० ते ८००० किमी पर्यंत असते. या पाणबुड्या एका फेरीत जगातील कोणत्याही ठिकाणी जाऊन पोहोचू शकतात. 

Web Title: Big movements in the European sea! Thirty years later, France has deployed three nuclear-armed submarines same time Russia ukraine War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.