डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर टेस्ला सीईओ एलॉन मस्कपासून रॉबर्ट एफ अनेक नावे चर्चेत आली आहेत. कॅनेडी ज्यूनिअर आणि हल्क होगान यांच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे. परंतु टीम ट्रम्प यांच्या वंडर वुमेन्सबाबत कमी लोकांना ठाऊक आहे. टीम ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ४ टॉप वुमेनची चर्चा आहे. त्यांना ट्रम्प सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.
सर्वात पहिलं नाव माजी खासदार तुलसी गबार्ड, अमेरिकेतली पहिल्या हिंदू खासदार तुलसी यांना ट्रम्प यांच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाचं संचालक बनवण्यात आले आहे. डेमोक्रेटिक पक्षातून रिपब्लिकन पक्षात येणाऱ्या तुलसी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी २०२२ मध्ये डेमोक्रेटिक पक्ष सोडून अपक्ष म्हणून २०२४ च्या राष्ट्रपती निवडणूक लढवली मात्र त्यानंतर त्या या स्पर्धेतून बाहेर पडल्या. तुलसी गबार्ड यांनी अनेकदा पाकिस्तान, बांगलादेशात होणाऱ्या हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविरोधात आवाज उचलला आहे. गुप्तचर विभागासह त्या व्हाईट हाऊसच्या सल्लागारही असतील. अमेरिकेतली १८ गुप्तचर संस्थेचे त्या कामकाज पाहतील.
त्यानंतर ट्रम्प यांनी न्यूयॉर्क सीनेटर संयुक्त राष्ट्रात अमेरिकेन राजदूत पदासाठी एलिस स्टॅफेनिक यांची निवड केली आहे. एलिस या ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी हॉर्वर्डमधून शिक्षण घेतले असून माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात प्रशासनात काम केले आहे. ट्रम्प यांच्या विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जाते. त्यांच्या निवडीची घोषणा करताना ट्रम्प यांनी America's First Fighter असा उल्लेख केला. २०१९ मध्ये महाभियोगावेळीही त्यांनी ट्रम्प यांना साथ दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममधील अन्य वंडर वुमेन क्रिस्ट्री नोएम, डकोटोच्या गवर्नर क्रिस्ट्री यांना ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात होमलँड सिक्युरिटी मिनिस्टर बनवले आहे. २०१८ साली पहिल्यांदा त्या दक्षिण डकोटाच्या महिला गवर्नर बनल्या होत्या. त्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड टम्प यांचे समर्थन त्यांना मिळाले होते. त्या त्यांच्या बिनधास्त प्रतिमेसाठी ओळखल्या जातात. त्यामुळे सीमा सुरक्षा, सायबर धोका, दहशतवाद रोखणे यासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, टीम ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत चीफ ऑफ स्टाफ सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर सूजन उर्फ सूजी वाइल्सची निवड करण्यात आली आहे. त्या व्हाइट हाऊसमध्ये चीफ ऑफ स्टाफ बनणाऱ्या पहिल्या महिला असतील. या पदावर महिलेची निवड करून ट्रम्प यांनी मतदारांना संदेश दिला आहे. निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्यावर महिलांबाबत अनेक आरोप झाले. अनेक महिला सेलिब्रिटींनी ट्रम्पविरोधात कमला हॅरिस यांचा प्रचार केला होता.