अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच याची चर्चाही सुरू आहे. परंतु जगातील सर्वात ताकदवान देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या निर्णयामागे एका भारतीय वंशाच्या महिलेची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. विजया गड्डे असं त्यांचं नाव असून त्या ट्विटरमध्ये मोठ्या पदावरही कार्यरत आहेत. अमेरिकेची संसद असलेल्या ‘कॅपिटल’ इमारतीवर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्विटरने भविष्यातही ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्यं, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यामागे विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्या ट्विटरच्या पॉलिसी, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रकरणांच्या प्रमुख आहेत. पुन्हा हिंसाचारासारखे प्रकार नाकारता येत नाहीत त्यामुळे ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विजया गड्डे यांनी आपल्या कंपनीच्या धोरणांबद्दल माहिती प्रकाशित केली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी एक लिंकही दिली असून त्यावर अधिक माहिती दिली असल्याचंही म्हटलं आहे.
ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका
By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 13:34 IST
ट्रम्प समर्थकांच्या संसद इमारतीतील हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर खातं करण्यात आलं बंद
ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका
ठळक मुद्देट्विटरची धोरणं ठरवण्यामागेही त्या महिलेची मोठी भूमिकाट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर बंद करण्यात आलं होतं त्यांचं ट्विटर अकाऊंट