शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 8:01 PM

चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. कोविड विषाणू जेनेटिकली इजिनिअर्ड होता असा दावा कर्मचाऱ्यानं केला आहे. वुहान लॅबमधूनच हा व्हायरस लीक झाल्याचेही त्यांनी सांगितले. वुहान इंस्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीमधून हा विषाणू लीक झाल्याचा आरोप इकोहेल्थ अलायन्सचे माजी व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अँड्र्यू हफ यांनी केला आहे. कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन प्रशासन या विषाणूसाठी चीनला जबाबदार धरत आहे. मात्र, चीनने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.

“कोरोनाची महासाछी भयानक जेनेटिक इंजिनिअरिंगचा परिणाम होती. या लॅबला अमेरिकन सरकारकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळालं होतं. इकोहेल्थ अलायन्स आणि परदेशी प्रयोगशाळांमध्ये योग्य जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनासाठी पुरेसे नियंत्रण उपाय नव्हते. याचा परिणाम म्हणून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा धोकादायक विषाणू बाहेर पडला,” असा दावा हफ यांनी आपलं पुस्तक ‘द ट्रुथ अबाऊट वुहान’ या पुस्तकातून केला आहे.

वुहान लॅब सोबत कामडॉ. हफ यांनी २०१४ ते २०१६ पर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये काम केलं आहे. २०१५ मध्ये त्यांना या कंपनीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. अमेरिकन सरकारचे शास्त्रज्ञ म्हणून ते या संशोधन कार्यक्रमावर गुप्तपणे काम करत होते. ते म्हणाले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या निधीतून इकोहेल्थ अलायन्स दहा वर्षांहून अधिक काळ वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंचा अभ्यास करत आहे. हे काम करत असताना त्यांचे आणि चीनच्या वुहान लॅबमध्ये खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं.

चीनला कोरोनाबाबत माहिती होतीकोरोना विषाणू जेनेटिकली इंजिनिअर्ड विषाणू आहे हे चीनला पहिल्या दिवसापासून माहित होते. बायोटेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी अमेरिकन सरकारही दोषी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. द सनशी बोलताना डॉ हफ म्हणाले की त्यांनी जे पाहिले ते पाहून भीती वाटली. आम्ही त्यांच्याकडे जैविक शस्त्रांचे तंत्रज्ञान सुपूर्द केले. ‘काही लोभी शास्त्रज्ञांनी जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला. SARS-CoV-2 च्या प्रादुर्भावाबद्दल चिनी लोक खोटे बोलले याचे कोणालाही आश्चर्य वाटू नये,’ असा दावाही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या