अबुजा : नायजेरियातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करशहा मुहम्मदू बुहारी विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांचा २५ लाख ७० हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीद्वारे नायजेरियात प्रथमच सत्तेचे लोकशाही पद्धतीने हस्तांतरण होत आहे. १९६० मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून सहा वेळा लष्करी बंडाला सामोऱ्या गेलेल्या या देशातील लोकांनी जोनाथन यांच्याकडे सलग १६ वर्षे देशाची सूत्रे दिली होती. बोको हरामच्या हिंसाचाराने अंतर्बाह्य रक्तबंबाळ झालेला हा देश राजकीय बदलाला आसुसलेला होता. लोकांची ही आस मतपेटीतून प्रतिबिंबित झाली.
नायजेरियात बुहारी विजयी
By admin | Published: April 01, 2015 11:24 PM