काठमांडू: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. हत्येच्या आरोपाखाली तो 2003 पासून नेपाळी तुरुंगात बंद आहे. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांत त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
भारतीय वडीलल आणि व्हिएतनामी आईच्या पोटी जन्मलेल्या शोभराजवर 1975 मध्ये नेपाळमध्ये जाण्यासाठी बनावट पासपोर्टचा वापर करून दोन पर्यटकांची हत्या केल्याचा आरोप होता. अमेरिकन कोनी जो बोरोन्झिच आणि त्याची कॅनेडियन गर्लफ्रेंड लॉरेंट कॅरियर यांची हत्या केल्याचा शोभराजवर आरोप आहे.
1 सप्टेंबर 2003 रोजी एका वृत्तपत्राने त्याचे छायाचित्र प्रकाशित केल्यानंतर शोभराज नेपाळमधील कॅसिनोबाहेर दिसला. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 1975 मध्ये काठमांडू आणि भक्तपूर येथे दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. तो काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात 21 वर्षांची शिक्षा भोगत आहे. अमेरिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्याला 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.