वॉशिंग्टन : एच१बी व्हिसाचे नियम अधिक कडक करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे अमेरिकेच्या दोन सिनेट सदस्यांनी जाहीर केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारतीय आयटी कंपन्यांना फटका बसू शकतो. सिनेटर चक ग्रेसली आणि डिक दर्बान यांनी ही घोषणा केली आहे. ग्रेसली यांनी सांगितले की, एच१बी व्हिसा योजना अमेरिकेत उच्च दर्जाचे मनुष्यबळ यावे यासाठी आणण्यात आली होती. दुर्दैवाने कंपन्यांनी अमेरिकी नागरिकांच्या जागी विदेशी नागरिकांची भरती करण्यासाठी तिचा गैरवापर केला. हे थांबविण्यासाठी आम्ही नवे विधेयक सादर करू.
एच१बी व्हिसाचे नियम कडक करण्यास विधेयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 4:41 AM