वॉशिंग्टन : अल-काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने त्याच्या २ कोटी ९० लाख डॉलर इतक्या रकमेतील बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी मागे ठेवली होती. त्याची वेगवेगळी पत्रे आणि अन्य कागदपत्रे यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. आपल्या मृत्यूनंतर बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी वापरावी, असे त्याने लिहून ठेवले आहे. २०११ मध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात त्याचा खात्मा केल्यानंतर ११३ दस्तऐवज हाती लागले आहेत. त्यात एक पत्र त्याच्या पैशाच्या वाटपाबाबत आहे. हे पत्र त्याचे मृत्यूपत्र म्हणून समजले जात आहे.